पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्ताविरोधात मोठी कारवाई केली, भारतानं या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वात आधी सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिली, त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले, एवढंच नाही तर अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली. आयात, निर्यात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
दरम्यान सिंधू नदीच्या जल वाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला होता. पाकिस्तानकडून इशाराही देण्यात आला, मात्र भारतानं पाकिस्तानच्या इशाऱ्याला जुमानलं नाही, त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली, त्यानंतर पाकिस्तानला असं वाटत होतं की भारताच्या या निर्णयामध्ये वर्ल्ड बँक हस्तक्षेप करेल, मात्र आता पाकिस्तानच्या या आशेवर देखील पाणी फिरलं आहे. जागतिक बँकेनं पाकिस्तानला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

जागतिक बँकेनं या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, आम्ही भारताला निर्णय घेण्यापासून रोखू शकत नाही, या प्रकरणात आमची कोणतीही भूमिका नाही, त्यामुळे आम्ही या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाहीत, वर्ल्ड बँकेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे पाकिस्तानला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान त्यानंतर भारताकडून पाकिस्तामध्ये घुसून एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानं पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टिम उद्ध्वस्त करून टाकली.
मात्र तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत, गुरुवारी देखील पाकिस्तानकडून भारताच्या सिमावर्ती भागात हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा हल्ला भारतानं परतून लावला आहे. भारतानं पाकिस्तानचे आठ मिसाईल पाडले आहेत. अनेक ड्रोन देखील पाडण्यात आले आहेत. तरी देखील पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात गोळीबार सुरूच आहे.
हेही वाचा –
भारत-पाक तणावातही IPL होणार? मित्रदेशाने पुढे केला मदतीचा हात
मोदी साहेबांनी ठरवलं तर अर्धा तासात पाकिस्तान संपेल
पाकडे पुन्हा पिसाळले, भारतीय सैन्याने सगळे ड्रोन पाडले