अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसा निमित्त आरोपी सुकेश देणार 100 आयफोन आणि 1 यॉट

WhatsApp Group Join Now

मनी लाँड्रिंग, घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) तिच्या वाढदिवसानिमित्त एक यॉट भेट दिली आहे. रविवारी (11 ऑगस्ट) रोजी जॅकलिनचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुकेशने ही घोषणा केली. सुकेशने जॅकलीनला गिफ्ट दिलेल्या यॉटलाही तिचेच नाव देण्यात आले आहे.

एका वृत्तानुसार, सुकेशने जॅकलिनला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ही तीच यॉट आहे, जी सुकेशने 2021 मध्ये जॅकलिनसाठी निवडली होती. ‘लेडी जॅकलिन’ नावाची ही यॉट या महिन्यात डिलीव्हर होणार आहे. यॉटचे सर्व कर भरले गेले असून सगळा व्यवहार कायदेशीर असल्याचा दावा सुकेशने केला आहे.

जॅकलीन प्राण्यांची देखभाल करण्यासासाठीही काम करते. याबाबत सुकेशने सांगितले की, त्याने जॅकलिनला बेंगळुरूमध्ये भेट दिलेले पेट हॉस्पिटल या वर्षी पूर्ण होत आहे. त्याशिवाय, सुकेशने जॅकलिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वायनाड भूस्खलन पीडितांना 15 कोटी रुपये आणि 300 घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. जॅकलिनवर चित्रित केलेले ‘यिम्मी यम्मी’ हे गाणे सुपरहिट करण्यासाठी 100 आयफोन 15 प्रो देण्याची घोषणा केली आहे.

WhatsApp Group Join Now

29 मे 2015 रोजी सुकेशवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420 (फसवणूक) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) आणि प्राइज चिट्स एवं मनी सर्कुलेशन स्कीम्स (प्रतिबंध) कायदा आणि ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या महाराष्ट्र संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयपीसीच्या काही कलमांखाली गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली होती. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्सही पाठवले होते. ईडीने तिची चौकशीदेखील केली.

2022 मध्ये दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रानुसार, सुकेशने जॅकलिनसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी काळ्या पैशाचा वापर केल्याचा आरोप आहे. याशिवाय सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली होती.

सुकेश चंद्रशेखर संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात डिसेंबर 2021 मध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचेही नाव समोर आले होते. यानंतर ईडीने तपास केल्यानंतर जॅकलीनलाही आरोपी केले होते. शिवाय जॅकलीनची या प्रकरणात अनेकदा चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर जॅकलीन आणि सुकेशच्या नात्याबाबत सर्वांना माहिती मिळाली होती. सुकेश तुरुंगात असताना जॅकलीन त्याला भेटण्यासाठी जात होती. सुकेशने तिला अनेक महागडे गिफ्ट दिले होते. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा:

कांस्य पदक विजेती मनु भाकर सोबत फोटोशूट करणं जॉन इब्राहम ला पडलं महागात

बिग बॉसच्या घरातील सर्वात महागडा स्पर्धक कोण? धनंजय पवार DP कि आणखीन कोण

WhatsApp Group Join Now

Leave a Comment