संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस, शहाजीबापूंचा जोरदार हल्लाबोल

WhatsApp Group Join Now

संजय राऊत हा रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस आहे. त्याला कपटनीती ही चांगल्या पद्धतीने येते. त्यांनीच ही भाजप आणि शिवसेनेची युती तोडली असल्याचा आरोप आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.

पुढे त्यांनी असे म्हटले की, संजय राऊताचं स्वप्न भंग करून पुन्हा आम्ही एक झालेले आहोत आमचं आणि भाजपचे सरकार आता सुरळीत चालू असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, शिंदे सरकार हे डरपोक सरकार आहे. ते निवडणुका घ्यायला घाबरत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

या टीकेवर बोलताना शहाजी बापू पाटील यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘शिंदे सरकार हे डरपोक सरकार नसून जगाच्या पाठीवर जे धाडस दाखवले आणि संजय रावताला म्हणाव तुम्हाला सत्तेतून बाहेर काढण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले शिंदे साहेब हे धाडसी नेतृत्व आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व आहे’, असे शहाजी बापू म्हणाले.

तर तळागाळातले प्रश्न जाणून घेऊन रात्रंदिवस काम करणारा मुख्यमंत्री राज्याला देण्यात आम्हाला यश मिळाले हेच आमचे आमदारकीचे खरे सार्थक झाल्याचेही त्यांनी म्हटले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Group Join Now

Leave a Comment