▪ एका सर्वेनुसार भारतातील लोकसंख्येच्या केवळ 3% लोक हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात.
▪️अर्थात यामध्ये नवीन लोकांची संख्या वाढत आहे मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना बऱ्याच वेळा कुठला शेअर विकत घ्यावा किंवा कुठल्या कंपनीतला शेअर हा दीर्घ कालावधीसाठी योग्य ठरेल?
▪️हे काही साधे प्रश्न गुंतवणूकदारांना पडत असतात.
*📈आजच्या या लेखामधे आपण लार्ज कॅप फंड बद्दल माहिती घेणार आहे.*
▪️कंपनी निवडताना लार्ज कॅप, मिडकॅप की स्मॉल कॅप मधून निवडावी हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतोच.
▪️पैशाची गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने गुंतवणुकीचा आराखडा तयार करणं गरजेचं आहे.
▪️उदाहरणार्थ गुंतवणूक करताना दीर्घ कालावधीसाठी की छोट्या कालावधीसाठी पैशाची गुंतवणूक करावी?
▪️पैसे गुंतवण्याचा नेमका हेतू काय आहे? जेव्हा गरज असेल तेव्हा तुमचे पैसे अडकून न राहता सहजपणे तुम्हाला मिळू शकतील का ?
▪️या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शेअर मार्केटमधे पैसे गुंतवणे सोपे जाऊ शकेल.
▪️कोणताही फंड किंवा शेअर हा दीर्घ कालावधीसाठी निवडला आणि गुंतवणूक केली तर इतर म्हणजे मिडकॅप आणि स्मॉल कॅपच्या तुलनेने ही गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा द्यायला मदत करू शकतो.
▪️असे का ? तर याचे कारण आपण पुढे बघणार आहे.
गुंतवणूक : इरेडा कंपनीची माहिती
💵लार्ज कॅप फंड
▪️ज्या कंपन्यांचे मार्केट मधले भांडवली मूल्य अधिक आहे, अशा कंपनी लार्ज कॅप फंडमधे मोडतात.
▪️यात टॉपच्या 100 अशा कंपन्यांमधे लार्ज कॅप फंड गुंतवणूक करत असतात.
▪️यांना ब्लु-चिप कंपन्या असंही म्हटलं जातं.
▪️लार्ज कॅप फंडमधली गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी उत्तम अशी गुंतवणूक मानली जाते.
▪️कारण या कंपन्यांमधे स्थिर परतावा देण्याची क्षमता असते. दीर्घकाळासाठी म्हणजे कमीतकमी 3-5 वर्षे तरी पैसे गुंतवण्याची तयारी हवी.
टीप – वरील माहिती फक्त एज्युकेशन पर्पज साठी आहे. आम्ही गुंतवणूक करण्याचा कोणताही सल्ला देत नाही.
कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.