मोबाइलच्या एका क्लिकवर सर्व वस्तू आता सहज घरपोच मिळू लागल्या आहेत. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाइन मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्वांमध्ये आता स्वीगी (Swiggy) या ऑनलाईन फूड देणाऱ्या कंपनीनेही ग्रोसरीपासून कपड्यांपर्यंतच्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सेवा सुरु केली आहे.
यासाठी स्वीगी इन्स्टामार्ट सुरु करण्यात आलं आहे. एका महिलेने स्विगीवरुन अर्ध्या रात्री अशीच एक वस्तू मागवली ज्याची चर्चा सोशल मीडिआवर सुरु आहे. ही वस्तू डिलिव्हरी करणाऱ्या मुलालाही महिलेच्या घरी जाण्यासाठी भीती वाटू लागली. ही वस्तू अर्ध्या रात्री का मागवली असेल हा विचार करुन डिलिव्हरी बॉयला (Delivery Boy) अक्षरश: घाम फुटला. सोशल मीडियावर हा घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
महिलेने स्विगीवरुन चक्क साडी मागवली
ही घटना कर्नाटक राज्यातील बंगळुरुमधली आहे. कर्नाटकात 6 ते 15 सप्टेंबरदरम्यान ओनम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादरम्यान बंगळुरुमध्ये राहणाऱ्या एका महिलेने अर्ध्या रात्री स्वीगीवरुन एक वस्तू मागवली. ही सर्व घटना महिलेनेच सोशल मीडियावर शेअर केली असून तिची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. महिलेची ही पोस्ट आतापर्यंत 1 लाख 70 हजार यूजरने पाहिली आहे.
वास्तविक या महिलेने स्वीगीवरुन साडी ऑर्डर केली होती. अर्ध्या रात्री महिलेने साडी मागवल्याने डिलिव्हरी बॉय घाबरला. ही हिला भूताटकी करत असेल आणि यासाठीच तिने इतक्या रात्री साडी मागवली असेल असे विचार आल्याने त्याला घाम फुटला.
महिलेने यासंदर्भात सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
या महिलेने स्वीगीचे आभारही मानले आहेत. शेवटच्या क्षणी स्वीगीने माझी मदत केली. यावर स्वीगी केअरनही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्हाला ओनमची मिठाई खाऊ घाला’ असं स्वीगीने म्हटलं आहे.
नीरजा नावाच्या या महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपला अनुभव सांगितला आहे. बंगुळुरु मोठ्या प्रमाणावर ओनम सण साजरा केला जातो. सण साजरा करण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी प्लानिंग केली. त्यामुळे @SwiggyInstamart वरुन एक साडी ऑर्डर केली’ असं महिलेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुढे तीने म्हटलंय साडीची ऑर्डर पाहून स्वीगी डिलिव्हरी बॉय देखील घाबरला होता. इतक्या रात्री कोणी साडी मागवेल याचा विचारही त्यने केला नसेल. असं या महिलेने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.