पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान पुरता हादरला आहे. यानंतर भारतावर सूड उगवण्यासाठी पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, सतर्क भारतीय जवानांनी या हल्ल्याला त्वरित आणि प्रभावी प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा डाव यशस्वी होऊ दिला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यासाठी भारताने अत्याधुनिक S-400 सुदर्शन या हवाई सुरक्षा प्रणालीचा वापर केला.
भारताने S-400 सुदर्शन वापरण्याची ही पहिलीच वेळ होती. भारताने २०१८ मध्ये रशियाकडून S-400 सुदर्शन खरेदी केले होते.१८ मध्ये भारताने ५.४३ अब्ज डॉलरमध्ये (जवळपास ₹४.६५ लाख कोटी) खरेदी केली होती. या करारानुसार भारताला एकूण पाच S-400 सुदर्शन मिळणार होते. त्यापैकी आता तीन S-400 सुदर्शन मिळाले आहेत.
उर्वरित दोन S-400 सुदर्शन हे २०२६ च्या सुरुवातीपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. भारतात पहिले S-400 सुदर्शन हे डिसेंबर २०२१ मध्ये भारतात आले होते. ते पश्चिम सीमेवर तैनात करण्यात आले. त्यानंतर पुढील दोन वर्षांत दुसरे आणि तिसरे युनिट पश्चिम आणि पूर्व सीमेवर तैनात करण्यात आले.

-400 सुदर्शन ही एक लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली असून जी विमाने, ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारख्या धोक्यांना ४०० किलोमीटर दूरवरून ओळखते. त्यात यांना नष्ट करण्याची देखील क्षमता आहे. जर शत्रूच्या हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर S-400 सुदर्शन फक्त पाच मिनिटांत तयार होऊ शकते. या प्रणालीमुळे भारताच्या हवाई सुरक्षेला मोठे बळ मिळाले आहे.
भारत व्यतिरिक्त ही प्रणाली रशिया, चीन आणि तुर्कीसारख्या देशांकडेही आहे. भारताने आपली लष्करी क्षमता आधुनिक बनवण्यासाठी आणि हवाई सुरक्षा सुधारण्यासाठी ती खरेदी केली होती. याच एस-४०० ‘सुदर्शन’च्या बळावर भारताने पाकिस्तानचे क्षेपणास्त्र हल्ले निष्फळ ठरवले आहेत.
हेही वाचा –
डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानला धमकी
पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट, पुण्यातील तरुणीवर पोलिसांकडून अटकेची कारवाई
पाकिस्तान आणि चीनची मस्ती जिरवणाऱ्या S-400 ची किंमत किती?