इचलकरंजी विधानसभेसाठी राहुल खंजीरे यांना मिळणार संधी?

WhatsApp Group Join Now

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या जडणघडणीत खंजीरे घराण्याने मोठे योगदान दिले आहे. देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांनी इचलकरंजीसाठी व काँग्रेससाठी अतुलनीय कामगीरी केली तर व स्वर्गीय आम. सरोजनीताई खंजीरे या शिरोळच्या आमदार असताना या तालुक्याचा कायापालट करण्यात त्यांचा मोठा हातभार आहे.

 

हाच राजकीय वारसा लाभलेले व कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजीतील काँग्रेसचे उमदे नेतृत्व म्हणून परिचीत असलेले राहूल खंजीर यांना इचलकरंजी विधानसभेसाठी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

WhatsApp Group Join Now

इंडस्ट्रीयल इस्टेटच्या माध्यमातून प्रकाश खंजीरे यांच्या पाऊलावर, पाऊल ठेवून पॅट्रीयट ग्रुपच्या माध्यमातून राजकारणाचे धडे घेत आपली घोडदौड कायम ठेवत राजकारणात सक्रिय असलेले राहूल खंजीर यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत.

 

तर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून राहूल खंजीरे यांनी आपल्या घराण्याचे नाव कायम उंचावत ठेवत पक्षाचीही भरभराटी कायम ठेवली आहे. तसेच

 

इचलकरंजी पालिकेचे नगरसेवक असताना आपल्या मतदार संघासह इचलकरंजी विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. यामुळे विधानसभेसाठी राहुल खंजीरे यांच्या नावावर कार्यकत्यांसह अनेक नेत्यांची पसंती आहे. म्हणूनच त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी पक्षामध्ये अंतर्गत हालचाली सुरू असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

तशी चर्चा सुरू झाली आहे पण पक्ष पातळीवर श्रेष्ठीच निर्णय घेणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात इचलकरंजीचे राजकारण सध्या वेगळ्या वळणावर असून सर्वच पक्षातून विधानसभेसाठी अनेक ज इच्छुक आहेत पण स्वच्छ प्रतिमा असलेले व राजकीय वारसा लाभलेल्या राहूल खंजीरे यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी अशी अनेकांची इच्छा आहे. ती पक्षाने सत्यात उतरावी अशी मागणी कार्यकत्यांतून होवू लागली आहे.

 

महाविकास आघाडीतर्फे इचलकरंजीतून अनेकांनी उमेदवारी मागितली असली तरी हा इचलकरंजी विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला आहे. यामुळेच ही जागा काँग्रेसलाच सुटणार आणि राहूल खंजीरंना उमेदवारी मिळणार या चर्चांना आता उधाण आले आहे.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment