बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनने 28 जुलैपासून सुरूवात केली असून, यंदा शोला “चक्रव्युह” थीम देण्यात आले आहे. या सीझनमध्ये लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख होस्टच्या भूमिकेत दिसत आहेत. महेश मांजरेकर यांनी मागील सीझनमध्ये होस्टिंग केली होती, परंतु यावेळेस रितेश देशमुख प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
रितेश देशमुखच्या मानधनाची रक्कम
रितेश देशमुखने बिग बॉस मराठी 5 साठी किती मानधन आकारलं आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रितेश देशमुखने या शोसाठी 6 ते 7 कोटी रुपये मानधन आकारले आहे. यामुळे शोसाठी त्यांच्या फीची रक्कम प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रति एपिसोड मानधन: 40 लाख रुपये
अंदाजानुसार, रितेश देशमुखने बिग बॉस मराठी 5 साठी प्रत्येक एपिसोडसाठी 40 लाख रुपये मानधन घेतले आहे. हा शो साधारणपणे 14 आठवड्यांसाठी चालतो, त्यामुळे रितेशच्या एकूण मानधनाची रक्कम सुमारे 5.6 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे एकंदरीत बिग बॉस मराठी साठी यंदाच्या सीजन करीता रितेश देशमुख ने महेश मांजरेकरांपेक्षा दुप्पट फी आकारली असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा:
फोटोशूट करणं जॉन इब्राहम ला पडलं महागात
शाळेमध्ये होती शिक्षिका, आता घेत आहे कोटींचे मानधन, कोण आहे हि टॉप ची अभिनेत्री?