राहुल आवाडे भाजपाचे उमेदवार, तर मा. आमदार हाळवणकर यांना विधान परिषदेवर मिळणार संधी

WhatsApp Group Join Now

बहुचर्चित इचलकरंजी विधानसभेचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जवळपास फिक्स झाला आहे . आणि ही उमेदवारी राहुल आवाडे यांनाच मिळण्याची शक्यता आहे तसे संकेतही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले आहे.

माजी आमदार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्याशी असलेल्या मतभेदाला पूर्णविराम मिळाला असून, कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाने येणाऱ्या निवडणुकीला भाजप म्हणून एकसंधपणे सामोरे जाऊ. सुरेश हाळवणकर व आपण मिळून पुढची राजकीय रणनीती, पक्षाची ध्येयधोरणे ठरवू, असे प्रतिपादन आ. प्रकाश आवाडे यांनी केले. राहुल आवाडे उच्चांकी मतांनी निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, खा. धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आवाडे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी झालेल्या चर्चेत एकत्रितपणाने जोमाने कामाला लागून इचलकरंजी विधानसभेचा विजय राज्यात उच्चांकी ठरावा यासाठी प्रयत्नशील राहावे, असे बावनकुळे यांनी नमूद केले. डॉ. राहुल आवाडे यांनी आगामी महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राहावे यासाठी मिळून काम करू. पक्षाकडे उमेदवारी मागितली असून ती निश्चित मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.

WhatsApp Group Join Now

माजी आमदार हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेतले जाणार

माजी आमदार हाळवणकर यांचे काम खूप चांगले आहे. त्यांनी पक्ष बांधणीसाठी केलेले अपार प्रयत्न यातूनच त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे व एक प्रकारे त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल असेही संकेत देण्यात आले.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment