प्रकाश आवाडे अण्णा बस नाम ही काफी है..

WhatsApp Group Join Now

वस्त्रोद्योग व्यवसायाला नव संजीवनी, अन् यंत्रमागधारकांना दिलासा; अण्णांच्या प्रयत्नांमुळे वीज सवलत नोंदणी अट रद्द

यंत्रमागधारकांच्या २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी ७५ पैशांची अतिरिक्त आणि २७ अश- वशक्तीखालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट १ रुपयांच्या वीज सवलतीमध्ये अडचण ठरत असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची तांत्रिक अट रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

याप्रश्नी वस्त्रोद्योगातील जाणकार आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. राज्यभरातील यंत्रमागधारकांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.

ऑनलाईन व ऑफलाईनची अट रद्द करून वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लावून धरली होती.

WhatsApp Group Join Now

त्यांनीही लवकरच कॅबिनेटची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. त्या अनुषंगाने मंगळवार, दि. १३ रोजी कॅबिनेटची बैठक होऊन त्यामध्ये वीज सवलतीच्या लाभासाठी असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करण्यात आली.

या निर्णयाबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment