पाकिस्तान स्वत:च्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकत आहे

WhatsApp Group Join Now

पाकिस्तान किती खालच्या पातळीवर जाऊ शकतं याचा नवा पुरावा आता समोर आला आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान अचानक भारताच्या सीमाभागातील राज्यांमध्ये ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराने सर्व हल्ले परतवून लावले. या घटनेनंतर आज परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पाकिस्तान किती क्रूर आहे याचा मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तान स्वत:च्या देशाच्या नागरिकांचा देखील विचार करत नाही, असंच यातून समोर आलं. पाकिस्तानने एवढा मोठा ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय वायुसेना प्रत्युत्तर देणार याची माहिती असताना देखील पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द बंद केली नाही. यामुळे पाकिस्तान किती खालच्या स्तरावरची खेळी खेळतो हे यातून स्पष्ट होतं.

परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरैशी यांनी पुरावा दाखवत पाकिस्तानच्या कुरापतीची माहिती दिली. पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, गुजरात, राजस्थान, पंजाबच्या विविध भागात तब्बल 36 ठिकाणी 400 ड्रोन्सचा मारा केला. भारताने त्याच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर भारताने देखील चार ड्रोन पाठवत पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली. पण पाकिस्तानने त्याहीपेक्षा मोठी क्रूरपणा केला.

पाकिस्तानचा नागरी विमानांचा ढाल म्हणून उपयोग

भारतावर हल्ला केल्यानंतर भारतीय वायुसेना प्रतिहल्ला करणार याची पाकिस्तानला जाणीव होती. त्यामुळे पाकिस्तानने त्यांचं हवाई क्षेत्र बंद करणं अपेक्षित होतं. पण पाकिस्तानने तसं केलं नाही. याउलट पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक सुरु ठेवली. असं असताना भारताने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असता तर या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीवर परिणाम पडला असता किंवा प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता.

WhatsApp Group Join Now

WhatsApp Group Join Now

त्यामुळे भारताने संयमाने परिस्थिती हाताळली. भारताने मानवतेचा विचार करुन वायुसेनेकडून कठोर पाऊल उचललं नाही. पण यातून पाकिस्तान किती खोटारडा आहे. पाकिस्तानला आपल्याच नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही हे स्पष्ट होतं. कर्नल सोफिया कुरैशी यांनी याबाबतचे सर्व पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले.

कर्नल सोफिया कुरैशी नेमकं काय म्हणाल्या?

पाकिस्तानचा बेजबाबदारपणा पुन्हा समोर आला. पाकिस्तानने रात्री साडेआठ वाजता ड्रोन आणि मिसाईल हल्ला केल्यानंतर आपलं हवाई क्षेत्र बंद केलं नाही. पाकिस्तान आपल्या नागरी विमानांना ढाल बनून उपयोग केला. भारतात हल्ला केल्ल्यानंतर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया दिली जाऊ शकते हे माहिती असताना पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केलं नाही. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेजवळ नागरी विमानांनी वाहतू सुरुच ठेवली. भारतीय वायुसेने आपली प्रतिक्रिया देताना संयम दाखवला आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीचं संरक्षण केलं, असं कर्नल सोफिया कुरैशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

 

हेही वाचा –

तरुणाने मित्रासह मिळून वृद्धाला संपवले अन् पायाला दगड बांधून विहिरीत फेकलेभारत-पाक तणावातही IPL होणार? मित्रदेशाने पुढे केला मदतीचा हात

मोदी साहेबांनी ठरवलं तर अर्धा तासात पाकिस्तान संपेल

पाकडे पुन्हा पिसाळले, भारतीय सैन्याने सगळे ड्रोन पाडले

WhatsApp Group Join Now

Leave a Comment