योजण जाहीर केल्यानंतर राज्य सरकार आता उद्योगधंदे आणि रोजगार निर्मिती याकडे लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी मोठया प्रमाणात निधी देऊ केला आहे. New Businesses in Maharashtra
राज्यात 81 हजार कोटींच्या गुंतवणुकीस मान्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यात 81,137 कोटी रुपये गुंतवणुकीचे सात मोठे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रीक वाहन, सेमीकंडक्टर चिप्स, आणि फळांचा पल्प निर्माण प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात 20,000 लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. New Businesses in Maharashtra
प्रमुख उद्योगप्रकल्पांची माहिती
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध औद्योगिक धोरणे आणि सामुहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत हे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये लिथियम आयन बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन, सेमीकंडक्टर चिप्स, सोलर पीव्ही मॉड्यूल्स, आणि फळांचा पल्प निर्मितीचे प्रकल्प शामिल आहेत.
लिथियम बॅटरी आणि इलेक्ट्रीक वाहन प्रकल्प
लिथियम बॅटरी प्रकल्प: जेएसडब्ल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन लि. द्वारे नागपूर येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामध्ये 25,000 कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे. 5,000 पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होईल.
इलेक्ट्रीक वाहन प्रकल्प: जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलीटी लि. द्वारे छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येणारा हा प्रकल्प 27,200 कोटी रुपये गुंतवणूक होईल आणि 5,200 पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होईल. वार्षिक 5 लाख इलेक्ट्रीक प्रवासी कार आणि 1 लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे.
सेमीकंडक्टर चिप्स, सोलर पीव्ही मॉड्यूल्स आणि मद्यार्क प्रकल्प
सेमीकंडक्टर चिप्स: आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या प्रकल्पामुळे तळोजा/पनवेल, रायगड/पुणे क्षेत्रात सेमीकंडक्टर चिप्स निर्मिती होईल. या प्रकल्पात 12,000 कोटी रुपये गुंतवणूक होईल आणि 4,000 पेक्षा अधिक रोजगार निर्माण होईल.
सोलर पीव्ही मॉड्यूल्स: आवाडा इलेक्ट्रो कंपनीचे प्रकल्प बुटीबोरी आणि भोकरपाडा येथील एमआयडीसी क्षेत्रात उभारण्यात येणार आहेत. 13,647 कोटी रुपये गुंतवणूक होईल आणि 8,000 पेक्षा अधिक रोजगार निर्माण होईल.
मद्यार्क निर्मिती: परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा.लि. द्वारे बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर येथे मद्यार्क निर्मितीचा प्रकल्प उभारला जाईल. या प्रकल्पात 1,785 कोटी रुपये गुंतवणूक होईल.
हेही वाचा : राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल, मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू
हेही वाचा : अजित पवार पुण्यात नाहीत तरीही धरण भरलंय, राज ठाकरेंचा पवारांना खोचक टोला