मिरजेतील कृष्णा घाट रोडवर लक्ष्मी मंदिरजवळ जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.
त्यांच्याकडून रोख रक्कम आणि तीन दुचाकी असा सुमारे ७५ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विशाल सुनील कदम (वय ३२, रा. भारत नगर, मिरज), विजय सुरेश भोसले (वय ४०, रा. माधव टॉकीज जवळ, मिरज), मौलाअली मुसा मुतवली (वय ३४, रा. दर्गा चौक, माळी गल्ली, मिरज), अकबर मजीद मकानदार (वय ४५, रा. उत्तम नगर, मिरज), तोफिक इब्राहिम मुश्रीफ (वय ३२, रा. कृष्णा घाट रोड), महादेव काशिनाथ लड्ढे (वय ३८, रा. कृष्णा घाट रोड), अझरुद्दीन मेहबूब मुजावर (वय ३६, रा. शास्त्री चौक, मिरज) या सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून ५ हजार ३४० रुपये रोख रक्कम, ७० हजार रुपये किमतीच्या ३ दुचाकी असा सुमारे ७५ हजार ३४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.