हा काय विषय, शरद पवार यांनी केला एकनाथ शिंदे यांचा गौरव

WhatsApp Group Join Now

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झाली,शामिमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत गायलं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ‘महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सोहळा आज पार पडत आहे. दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महादजी शिंदे यांच्या स्मृतीला वंदन करतो. या सन्मानापेक्षा येणारी जबाबदारी मोठी आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या पुरस्काराचं स्वरुप पाच लाख रुपये होतं, मात्र आता त्यात शिंदे यांनी आणखी पाच लाख रुपये घालून ही रक्कम 10 लाख रुपये करण्याचं जाहीर केलं आहे.

मला पुरस्कार देणारे जरी शरद पवार असले तरी ते देशाचे क्रिकेटपटू शिंदे यांचे जावई आहेत, कधी-कधी ते बाजूला बसलेल्या लोकांना गुगली टाकतात. पण माझ्यावर आजपर्यंत शरद पवार यांनी कधी गुगली टाकली नाही,टाकणार नाही अस वाटत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. माझ्यावर कितीही आरोप झाले तरी मी आरोपांना कामातून उत्तर दिले,मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

आज बाळासाहेब आणि दिघे साहेब असते तर त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती, असंही ते यावेळी म्हणाले.

 

WhatsApp Group Join Now

हेही वाचा

भारताला मोठा झटका, बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर

 

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment