मुस्लीम धर्म सोडून सनातन धर्मात घरवापसी केल्यास ₹3000 महिना; स्वतः हिंदू झालेल्या माजी वक्फ बोर्ड अध्यक्ष वसीम रिझवी यांची घोषणा

WhatsApp Group Join Now

धर्म परिवर्तन करून वसीम रिझवीचे जितेंद्र नारायण त्यागी झालेल्या शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी आता मुस्लीम समाजाला घर वापसीचे खुली आवाहन केले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी धर्म परिवर्तन करणाऱ्या मुस्लिमांना दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याची घोषणाही केली. ते मंगळवारी कुंभमेळ्यात संगमावर स्नान करण्यासाठी आले होते. यावेळी इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना तीन हजार रुपये महीना देण्याबरोबरच उद्योगासाठीही मदत केली जाईल, असेही ते म्हणाले.

जितेंद्र नारायण त्यागी म्हणाले, आज संगमावर स्नान केल्याने प्रचंड आनंद होत आहे. मी या पवित्र भूमीवरून संपूर्ण देशभरातील मुस्लिमांना सनातन धर्मात घरवापसी करण्यासंदर्भात विचार करण्याचे आवाहन करतो. मी माझ्या काही मित्रांसोबत एक संस्था तयार करत आहे, ही संस्था जे मुस्लीम कुटुंब सनातन धर्मात घरवापसी करेल, त्याला दर महिन्याला तीन हजार रुपये देईल. संबंधित कुटुंब सनातन धर्मात जोवर पूर्णपणे सेट होत नाही, तोवर ही रक्कम त्यांना दिली जाईल. तसेच, ज्यांना उद्योग करण्याची इच्छा असेल, त्यांना उद्योगासाठी मदतही केली जाईल.

हेही वाचा- बायको पेक्षा वयाने लहान असलेले भारतीय क्रिकेटपटू, सचिन विराटचा ही नंबर

त्यागी पुढे म्हणाले, आपण कट्टरतावादी आणि जिहादी मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. स्वतःच्या इच्छेने सनात धर्मात घरवापसी करा. सनातन धर्म आपले स्वागत करतो.

WhatsApp Group Join Now

महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी त्यांची सनातन धर्मात करून घेतली होती घरवापसी – उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी 3 वर्षांपूर्वी इस्लाम सोडून सनातन धर्मात घरवापसी केली होती. यानंतर त्यांनी आपले नाव बदलून जितेंद्र नारायण सिंह त्यागी असेकेले आहे. जुना अखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी त्यांची सनातन धर्मात घरवापसी करून घेतली आणि त्यांना नवे नाव दिले होते.

हेही वाचा- पठ्ठ्याने तब्बल 25 लाखांची नोकरी नाकारली; म्हणतोय 87 टक्के वाढ ही पुरेशी नाही

WhatsApp Group Join Now

Leave a Comment