आपल्या कोल्हापूरच्या राधानगरीचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे वय 28 वर्ष हा नेमबाज 1 ऑगस्टला 50 मीटर एयर रायफल स्पर्धेत पदकासाठी खेळणार आहे. आता भारतासाठी पदक जिंकणार आहे. पण मित्रांनो त्याचा कोल्हापूरच्या राधानगरीतून पॅरिस ऑलिंपिकपर्यंतचा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे.
क्रीडा प्रवासाची सुरुवात आणि प्राथमिक प्रशिक्षण
स्वप्नील मुळचा कोल्हापूरच्या राधानगरीचा असून, त्याने नेमबाजीचे प्राथमिक धडे नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीत घेतले. पुण्यात रेल्वे सेवेत असलेल्या स्वप्नीलने 2022 मध्ये एशियन गेम्समध्ये सांघिक सुवर्णपदक मिळवले होते.
आर्थिक अडचणींवर मात
स्वप्नील कुसाळे नावाच्या या क्रीडापटूने 2013 मध्ये राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. रेल्वेच्या नोकरीसह त्याने बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रबोधिनीमध्ये सराव केला. 2015 पासून तो मध्य रेल्वेच्या पुणे विभागात प्रवासी तिकीट परीक्षक म्हणून कार्यरत आहे.
स्वप्नीलच्या नेमबाजीच्या करिअरमध्ये आर्थिक अडचणी देखील आल्या. एक काळ असा होता की बुलेट्स खरेदीसाठी त्याच्या वडिलांनी बँकेकडून कर्ज घेतलं. सराव थांबू नये म्हणून माझ्या वडिलांनी बुलेट्स खरेदीसाठी कर्ज घेतलं, असे स्वप्नीलने सांगितले.
कुटुंब आणि प्रशिक्षकांचे योगदान
स्वप्नीलच्या यशात त्याच्या आई-वडिलांसोबतच प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी स्वप्नीलला शिस्त आणि जीवनाची योग्य दिशा दिली आहे. स्वप्नीलने 2013 पासून लक्ष्यातील स्पोर्ट्स संस्थेची मदत घेतली आणि दीपाली मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शिस्तीच्या अभ्यासात निपुण झाला.
ऑलिंपिक स्पर्धेतील आव्हान
स्वप्नील ऑलिंपिकच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात खेळणार आहे. या प्रकारात नेमबाजाला तीन वेगवेगळ्या शारिरीक पोझिशन्समध्ये फायरिंग करावी लागते. स्वप्नीलने ऑलिंपिकच्या पात्रता फेरीत सातवा क्रमांक प्राप्त करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या मेहनतीला यश मिळेल, असा विश्वास त्याच्या कुटुंबासह प्रशिक्षकांना आहे.
हेही वाचा:
ब्रेकिंग न्यूज…देवेंद्र फडणवीस होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?
मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू, राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल