भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या तणावपुर्ण परिस्थितीमुळे बीसीसीआयच्या आजच्या बैठकीत आयपीएलला आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे आता आयपीएलसाठी आठव़डाभर वाट पाहावी लागणार आहे.अशात आता आठवडाभरानंतर आयपीएल कुठे खेळवणार?असा प्रश्न आहेत.
याबाबत सध्या चाचपणी सूरू आहे.अशात आता आयपीएलच्या आयोजनासाठी या देशाने भारतापुढे मदतीचा हात पुढे केला आहे.त्यामुळे आता भारत ही मदत स्विकारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आयपीएल 2025 ला पुढे ढकलल्यानंतर, इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी एक्सवर पोस्ट लिहली होती. या पोस्टमध्ये त्यांनी भारताला इंग्लंडमध्ये आयपीएल आयोजित करण्याचा सल्ला दिला आहे.मायकेल वॉन यांनी लिहिले की मला आश्चर्य वाटते की आयपीएल ब्रिटनमध्ये पूर्ण करणे शक्य आहे का?
आमच्याकडे स्थळे देखील आहेत आणि ही लीग संपल्यानंतर, भारतीय खेळाडू कसोटी मालिकेसाठी राहू शकतात.त्यांनी लिहिले की ही फक्त त्यांची कल्पना आहे,असे वॉन यांनी शेवटी म्हटले आहे.
हेही वाचा –
IPL स्थगितीनंतर हार्दिक पंड्या आणि जास्मिन एकत्र परतले ; अफेअरच्या चर्चांना हवा
मोदी साहेबांनी ठरवलं तर अर्धा तासात पाकिस्तान संपेल
पाकडे पुन्हा पिसाळले, भारतीय सैन्याने सगळे ड्रोन पाडले