महाविकास आघाडी कडून हा नेता होणार मुख्यमंत्री

WhatsApp Group Join Now

राज्यात ऑक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नुकताच नवी दिल्ली दौरा केला.

या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्या भेटीत मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या. काँग्रेस निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यास तयार नसल्याचे वृत्त त्या दौऱ्यादरम्यान आले. परंतु आता शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुढील मुख्यमंत्री कोण असणार? हे स्पष्टपणे सांगितले.

त्यानंतर त्या सरकारकडून काय करण्यात येणार? त्याचीही माहिती दिली. आता निवडणुकीनंतर ठाकरे 2 सरकार येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणार असल्याचे संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संजय राऊत यांनी 370 कलम रद्द करण्याचा फायदा केवळ भाजपला झाल्याची टीका केली. देशाला कलम 370 करण्याचा काहीच फायदा झाला नाही. काश्मिरात 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवान शहीद होत आहेत.

WhatsApp Group Join Now

अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यात मोदी सरकारला यश आले नाही. नरेंद्र मोदी यांच्याकडे बहुमत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

धारावी प्रकल्पाची एक विट रचू देणार नाही

मुंबई शहरातील आणखी एक भूखंड अदानी यांना दिला आहे. कांजूरमार्ग येथील भूखंड दिला जात आहे. एकूण 22 बहुमूल्य भूखंड दिले महायुती सरकारकडून अदानी यांना दिले जात आहेत. हे सरकार तीन गँगचे सरकार आहे. पूर्वी लँड माफिया गुंडगिरी करत होते.

आता सरकारचे लाडके उद्योगपती यांना भूखंड दिले जात आहे. शिवसेना या प्रकल्पाची एकही विट रुचू देणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी केला. मंत्रिमंडळ बैठकीत जे वाद होत आहेत. गँगवार पेटले आहे. हे सरकारमधील शिंदे आणि फडणवीस गँगमधील वाद आहेत.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment