IPL स्थगितीनंतर हार्दिक पंड्या आणि जास्मिन एकत्र परतले ; अफेअरच्या चर्चांना हवा

WhatsApp Group Join Now

बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल 2025 ही स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर, हार्दिक पंड्या आणि त्याची कथित प्रेयसी, जास्मिन वालिया मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. त्यांच्यासह मुंबई इंडियन्सचे इतर क्रिकेटपटूही होते. यानंतर पुन्हा एकदा हार्दिक आणि ब्रिटिश गायिका आणि टीव्ही सेलिब्रिटी जास्मिन वालिया यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.

विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर हार्दिक त्याच्या कारकडे जात असताना, जास्मिनने मात्र वेगळी वाट धरली. यादरम्यान, मुंबई इंडियन्सची बस जवळच उभी होती, ज्यामध्ये तिलक वर्मा, मिशेल सँटनर आणि कॉर्बिन बॉशसारखे खेळाडू, तसंच टीममधील इतर सदस्य त्यांचे जोडीदार आणि मुलांसह गाडीतून उतरताना दिसले.

WhatsApp Group Join Now

मुंबईत परतल्यानंतर विमानतळावर एकाच ठिकाणी स्पॉट झाले पंड्या-जास्मिन

WhatsApp Group Join Now

11 मे रोजी IPL 2025 मधील पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यासाठी MI चा संघ 7 मे रोजी संध्याकाळी धर्मशाळा याठिकाणी रवाना होणार होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव धर्मशाळा विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले. त्यामुळे MI चा संघ मुंबईतच आहे. हा सामना मुंबईत होणार असल्याची सुरुवातीला चर्चा झाली, परंतु अखेर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मूळ वेळापत्रकानुसार सामना होईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार MI ची टीम गुरुवारी संध्याकाळी अहमदाबादमध्ये पोहोचली होती. आता संपूर्ण आयपीएल स्पर्धाच स्थगित झाल्यानंतर टीम पुन्हा मुंबईत परतली आहे. यादरम्यान हे दोघे एकाच ठिकाणी दिसून आले.

हेही वाचा –

पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट, पुण्यातील तरुणीवर पोलिसांकडून अटकेची कारवाई

पाकिस्तान आणि चीनची मस्ती जिरवणाऱ्या S-400 ची किंमत किती?

मोदी साहेबांनी ठरवलं तर अर्धा तासात पाकिस्तान संपेल

WhatsApp Group Join Now

Leave a Comment