गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २८ किलो गांजा, दोन मोबाईल व रोख दोन हजार रुपये असा पाच लाख ६८ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी केले आहे. गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार राजाराम तलाव परिसरात काही तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली यानुसार सापळा लावला असता निहाल इकबाल शेख (वय २७) राहणार शिरपूर धुळे व चरण लालासो शिंदे (वय ३२) राहणार मान जिल्हा सातारा यांना ताब्यात घेण्यात आल.
त्यांच्याकडे तीन बॅगा होत्या. या तीन बॅगामध्ये हा गांजा सापडला सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सपोनि चेतन मसुटगे, अंमलदार प्रवीण पाटील, वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदीप पाटील, संतोष बर्गे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, परशुराम गुजरे, अशोक पवार, अनिल जाधव, सुशील पाटील यांनी केली.