पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालले आहे. चोरी, दरोडा आणि इतर गुन्ह्यांच्या घटनांनी पुणेकरांच्या मनात धास्ती निर्माण केली आहे. गुन्हेगारींच्या घटकांमध्ये खाकी वर्दीची भीती नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पिझ्झा मिळाला नाही म्हणून हॉटेल चालकाला मारहाण करण्यात आलेली घटना ताजी असतानाच, पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
धारदार शस्त्राने हल्ला: पुण्यात खळबळ
पुण्यात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे. हल्ल्यानंतर, दहशत निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांनी हा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, ज्यामुळे शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रमोद देशमुख आहे, तर हल्लेखोरांची नावे अद्याप समजू शकलेली नाही.
हल्ल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ: नागरिकांच्या मनात भीती
हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी मारहाणीचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यात सहभागी चारही आरोपी अल्पवयीन आहेत. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पिझ्झावरून हॉटेल मालकाला मारहाण: पुण्यातील दुसरी घटना
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील खराडी भागातील एका हॉटेलमध्ये पिझ्झा देण्याच्या मागणीवरून हॉटेल मालकाला मारहाण करण्यात आली होती. अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, आणि विशाल सातव या चौघांनी हॉटेल बंद असतानाही पिझ्झा मागितला आणि नाकारल्यानंतर हॉटेल मालकाला दगडाने मारहाण केली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
धक्कादायक…सावंतवाडीत अमेरिकन महिला जंगलात सापडली लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत