चंदुरच्या तलाठ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

WhatsApp Group Join Now

संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रम राबवला जात असताना आज हातकलंगले तालुक्यातील मौजे चंदूर येथे तलाठी कार्यालयात 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट या दोन दिवसात एकदाही ध्वजारोहण करण्यात आले नाही.

याबाबत चंदुरच्या तलाठी राहत शेख यांना चंदुरचे सरपंच स्नेहल कांबळे यांनी जाब विचारला असता तलाठी राहत शेख यांनी उद्धट उत्तर देत आम्हाला ध्वजारोहण संबंधी कोणतीही शासकीय परिपत्रक मिळाले नसल्याचे सांगितले.

दरम्यान, ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावातील जेष्ठ नागरिक व गावकरी सर्वजण गाव चावडी येथे जमा झाले व याबाबत महसूल चे वरिष्ठ अधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिली.

हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील यांनी सर्व गावकऱ्यांच्या वतीने तलाठी राहत शेख यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केलेली आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Group Join Now

Leave a Comment