धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा छत्रपती संभाजी महाराज चौकातच बसवला गेला पाहिजे, अन्यथा परिणाम वेगळे होतील, असा गंभीर इशारा -देत शिवशंभु भक्तांनी चौंडेश्वरी मंदिर, दातार मळा येथे बैठकीत शपथ घेतली.
राजकीय इर्षेपोटी कॉ. के. एल. मलाबादे चौकात – छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा अट्टाहास केला जात आहे, तो तात्काळ सोडून देण्यात यावा.
आमचा तुम्हाला कोणताही विरोध नाही. पण, गेली ४० वर्षे छत्रपती संभाजी चौक शहरात अस्तित्वात आहे, २० वर्षापासून येथे पुतळा बसवावा, अशी लेखी मागणी होत आहे.
संग्राम चौक, हत्ती चौक, कागवाडे मळा, ढोरवेस, लिंबू चौक, संतमळा, आवाडेनगर, लंगोटे मळा, दातारमळा, बरगे मळा, जुना चंदूर रोड, बाळनगर, श्रीरामनगर, कलानगर या भागाची ओळख वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुतळा येथेच बसवावा, असा एकमुखी निर्णय घेऊन शपथ घेण्यात आली.
यावेळी श्री महाजन गुरुजी, दै. राष्ट्रगीतचे संपादक अजय तथा आबा जाधव, संतोष सावंत, संतोष शेळके, आनंदा मकोटे, अमृतमामा भोसले यांनी मार्गदर्शन केले.