कोल्हापुरात काँग्रेस कमिटीवर दगडफेक, उमेदवारालाच केली धक्काबुक्की

कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला. उमेदवारीसाठी दावेदार असलेले शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांना भेटण्यासाठी लाटकर गेले असता संतप्त चव्हाण समर्थकांनी लाटकर यांनाच धक्काबुक्की केली. यामुळे न भेटताच त्यांना माघारी फिरावे लागले. दरम्यान, सचिन चव्हाण यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदला, अशी थेट मागणी केली. … Read more

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून आज महाराष्ट्र विधानसभेसाठी जवळपास 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात बहुतांशी विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तसेच या यादीमध्ये काही नवख्या आणि युवा नेत्यांना सुद्धा उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. 99 उमेदवारांच्या नावाची यादी पाहण्यासाठी खालील लिंक … Read more

राहुल आवाडे भाजपाचे उमेदवार, तर मा. आमदार हाळवणकर यांना विधान परिषदेवर मिळणार संधी

बहुचर्चित इचलकरंजी विधानसभेचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जवळपास फिक्स झाला आहे . आणि ही उमेदवारी राहुल आवाडे यांनाच मिळण्याची शक्यता आहे तसे संकेतही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले आहे. माजी आमदार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्याशी असलेल्या मतभेदाला पूर्णविराम मिळाला असून, कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाने येणाऱ्या निवडणुकीला भाजप म्हणून एकसंधपणे सामोरे जाऊ. सुरेश हाळवणकर व … Read more

कोल्हापुरात 28 किलो गांजा पकडला

gang war pune

गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २८ किलो गांजा, दोन मोबाईल व रोख दोन हजार रुपये असा पाच लाख ६८ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी केले आहे. गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार राजाराम तलाव परिसरात काही तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची … Read more

इचलकरंजी विधानसभेसाठी राहुल खंजीरे यांना मिळणार संधी?

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या जडणघडणीत खंजीरे घराण्याने मोठे योगदान दिले आहे. देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांनी इचलकरंजीसाठी व काँग्रेससाठी अतुलनीय कामगीरी केली तर व स्वर्गीय आम. सरोजनीताई खंजीरे या शिरोळच्या आमदार असताना या तालुक्याचा कायापालट करण्यात त्यांचा मोठा हातभार आहे.   हाच राजकीय वारसा लाभलेले व कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजीतील काँग्रेसचे उमदे नेतृत्व म्हणून परिचीत असलेले राहूल खंजीर … Read more

चंदुरच्या तलाठ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रम राबवला जात असताना आज हातकलंगले तालुक्यातील मौजे चंदूर येथे तलाठी कार्यालयात 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट या दोन दिवसात एकदाही ध्वजारोहण करण्यात आले नाही. याबाबत चंदुरच्या तलाठी राहत शेख यांना चंदुरचे सरपंच स्नेहल कांबळे यांनी जाब विचारला असता तलाठी राहत शेख यांनी उद्धट उत्तर देत आम्हाला ध्वजारोहण संबंधी कोणतीही … Read more

इचलकरंजी कोल्हापूरचा धनंजय पवार DP बिग बॉस शो मध्ये रडला. काय आहे कारण?

कोल्हापूरचा डीपी दादा अर्थात धनंजय पोवार याने बिग बॉस मराठीच्या घरात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कुणी कितीही चिडलं आणि कितीही लोकं पिसाळून अंगावर आले तरी डीपी दादा हिंमतीने प्रसंगाला तोंड देतोय. एवढंच नाही तर डीपी दादामुळे घरात हसतं-खेळतं वातावरण आहे. याच डीपी दादाच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. जिओ सिनेमा अॅपवर अनसीन स्टोरीमध्ये डीपी … Read more