खुशखबर…लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता थेट बँक खात्यात जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिलांच्या बँक खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. इतके रुपये झाले जमा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. या योजनेचा पहिला हफ्ता मुंबईतील महिलेला मिळाला आहे. … Read more

MIM महाविकास आघाडी सोबत येणार? जलील यांनी दिली इंडिया आघाडीला ऑफर

छत्रपती संभाजीनगर इंडिया आघाडीसोबत जाण्याची AIMIM ची इच्छा आहे. तुम्ही आम्हाला घ्यायला तयार असाल तर इतक्या जागा आम्ही MIM ला देऊ शकतो ते सांगावे. तुम्ही उद्या मुंबईत बोलवा. महाराष्ट्राबाबत सर्व निर्णय असदुद्दीन औवेसी यांनी माझ्यावर सोडलेले आहेत. आपण एका बैठकीत सर्व निश्चित करू असं विधान एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेले आहे. माजी खासदार … Read more

महाराष्ट्रात तिसरी आघाडी. मनोज जरांगे पाटील आणि संभाजी राजे छत्रपती एकत्र.

येत्या विधानसभा निवडणुकीत स्वराज पक्ष सर्व जागा लढवणार असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्याशी संबंध नसणार असल्याचा खुलासा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज (दि.14) केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती करणार असल्याचे सांगत या विधानसभेला तिसरी आघाडी … Read more

प्रकाश आवाडे अण्णा बस नाम ही काफी है..

वस्त्रोद्योग व्यवसायाला नव संजीवनी, अन् यंत्रमागधारकांना दिलासा; अण्णांच्या प्रयत्नांमुळे वीज सवलत नोंदणी अट रद्द यंत्रमागधारकांच्या २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी ७५ पैशांची अतिरिक्त आणि २७ अश- वशक्तीखालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट १ रुपयांच्या वीज सवलतीमध्ये अडचण ठरत असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची तांत्रिक अट रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याप्रश्नी वस्त्रोद्योगातील जाणकार आमदार प्रकाश … Read more

धक्कादायक…पोलिसांनी भारतीय लष्कराच्या जवानाला निर्वस्त्र करुन केली मारहाण

भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शत्रूंना रोखून धरत सडेतोड प्रत्युत्तर देत असतात. मात्र घरी आल्यानंतर त्यांना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळते. असाच एक प्रकार राजस्थानच्या जयपूरमधून समोर आला आहे. जयपूरमधील शिप्रापथ पोलीस ठाण्यात पोलिसांनी लष्कराच्या कमांडोला विवस्त्र करून काठीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी शिप्रा पोलीस … Read more

या देशाच्या गृहमंत्र्यांनी मागितली हिंदू समाजाची हात जोडून माफी

काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. असं असलं तरी येथील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर आहे. जमावाकडून देशात … Read more

भीषण अपघात.. ट्रक-मोटरसायकल अपघातात युवक ठार

आष्टा-तासगाव रोडवर आष्टा येथील विटभट्टी जवळ मोटरसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कृष्णा रमेश लोहार (वय २५, रा. आष्टा) हा युवक ठार झाला. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी राजाराम शंकर माने आष्टा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार आष्टा पोलिसात ट्रक चालक अनिकेत लक्ष्मण माने (वय २३,रा खंडोबाचीवाडी ता. पलूस) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद … Read more

लाडकी बहीण योजनेचे पैसे तेव्हाच मिळणार जेव्हा बँक खाते आधार सोबत लिंक असेल?

आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ९८.९७ टक्के नोंदणी झाली असून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी तात्काळ बँक खाते आधार लिंक करुन घ्यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी महिलांना सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६ लाख ९६ हजार १०० अर्ज प्राप्त झाले होते. तथापि २६ हजार ७०८ … Read more

अजित पवारांना बसणार धक्का? राष्ट्रवादी कुणाची, सुप्रीम कोर्ट देणार उद्याच निकाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आता उद्याच (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाला या प्रकरणावर अंतिम निकाल देणं गरजेचं असणार आहे. राष्ट्रवादी कुणाची? सुप्रीम कोर्टात आता उद्याच सुनावणी; मोठा निकाल येणार? महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. … Read more

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर चप्पल फेकून मारायची होती इच्छा, मनसे नेत्याचं वादग्रस्त विधान

ठाण्यात शनिवारी मोठा राडा पाहायला मिळाला. मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ, शेण आणि टोमॅटो फेकून मारले. त्यानंतरल ठाण्यातील गडकरी रंगायतन सभेच्या ठिकाणीही दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. या राड्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी इच्छा होती चप्पल फेकून मारायची, मनसे नेत्याचं मोठं विधान; त्या राड्यानंतर मनसे आक्रमक? ठाण्यामध्ये … Read more

महायूतीला धक्का…मनोज जरांगे निवडणुकीला उभे राहणार, सोबतच 150 मराठा उमेदवार उभे करणार

आपल्या मराठ्यांत माझ्या सकट 150 उमेदवार आहेत. जर 29 तारखेला उभ करायचं ठरलं तर तुम्हाला जातीसाठी काम करायचं. एक जण उभं करायचं आणि त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचे. मराठ्यांनी 100 टक्के मतदान करायचं आहे. 3 महिने काम करा. 5 वर्ष मराठ्यांचे कल्याण होईल. मतदान झाल्याशिवाय तीर्थ क्षेत्राला जायचं नाही. बोगस मतदान बाहेर काढायचं, मतदान केल्याशिवाय … Read more

खतरनाक…इस्त्राईलने केला Whatsapp च्या मदतीने हमास नेत्याचा खात्मा

इराणच्या तेहरानमध्ये हमासचे सर्वोच्च नेते इस्माईल हानिया यांच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये ते ठार झाले. हा हल्ला कसा आणि कोणत्या पद्धतीने पार पडला यावर सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. व्हॉट्सॲपच्या कनेक्शनमुळे हानिया यांचा खात्मा करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. त्यांच्या ठिकाणाच्या माहितीमुळे हल्ला करणे सोपे झाले, असा आरोप आहे. व्हॉट्सॲपचे कनेक्शन हानिया यांचे … Read more

धारदार शस्त्राने केला वार, दहशत माजवण्यासाठी रील केली व्हायरल

gang war pune

पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालले आहे. चोरी, दरोडा आणि इतर गुन्ह्यांच्या घटनांनी पुणेकरांच्या मनात धास्ती निर्माण केली आहे. गुन्हेगारींच्या घटकांमध्ये खाकी वर्दीची भीती नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पिझ्झा मिळाला नाही म्हणून हॉटेल चालकाला मारहाण करण्यात आलेली घटना ताजी असतानाच, पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धारदार शस्त्राने हल्ला: पुण्यात … Read more

ब्रेकिंग न्यूज…देवेंद्र फडणवीस होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?

राजकीय वर्तुळात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची चर्चा जोर धरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फडणवीस यांनी सहकुटुंब भेट घेतल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांची जागा घेण्याच्या शर्यतीत फडणवीस अग्रस्थानी आहेत. जेपी नड्डा यांची जागा घेणार फडणवीस भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा … Read more

अजित पवार पुण्यात नाहीत तरीही धरण भरलंय, राज ठाकरेंचा पवारांना खोचक टोला | Raj Thackeray on Ajit Pawar

Raj Thackeray on Ajit Pawar

राज ठाकरेंचा पुणे दौरा आणि अजित पवारांना केल टार्गेट मनसेचे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतरच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली. विशेषत: पुण्यातील धरणांबद्दल आणि त्यांच्या परिस्थितीवर त्यांनी असंतोष व्यक्त केला. Raj Thackeray on Ajit Pawar … Read more

धक्कादायक…सावंतवाडीत अमेरिकन महिला जंगलात सापडली लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कराडीच्या डोंगरांमधील जंगलात एका अमेरिकन महिलेला लोखंडी साखळीने बांधून ठेवले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या महिले सोबत तिच्या पतीनेच असे कृत्य केल्याची माहिती समोर आलेली आहे. महिलेने स्वतःने एका कागदावर लिहून तिच्या बाबतीत घडलेल्या घटनांची माहिती दिली आहे. महिलेला पतीनेच बांधून ठेवले; तामिळनाडूतील पत्ता ही महिला मूळची … Read more