कोल्हापुरात काँग्रेस कमिटीवर दगडफेक, उमेदवारालाच केली धक्काबुक्की

कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला. उमेदवारीसाठी दावेदार असलेले शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांना भेटण्यासाठी लाटकर गेले असता संतप्त चव्हाण समर्थकांनी लाटकर यांनाच धक्काबुक्की केली. यामुळे न भेटताच त्यांना माघारी फिरावे लागले. दरम्यान, सचिन चव्हाण यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदला, अशी थेट मागणी केली. … Read more

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून आज महाराष्ट्र विधानसभेसाठी जवळपास 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात बहुतांशी विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तसेच या यादीमध्ये काही नवख्या आणि युवा नेत्यांना सुद्धा उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. 99 उमेदवारांच्या नावाची यादी पाहण्यासाठी खालील लिंक … Read more

मिरजेत जुगार खेळणाऱ्यांना केले अटक

मिरजेतील कृष्णा घाट रोडवर लक्ष्मी मंदिरजवळ जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.   त्यांच्याकडून रोख रक्कम आणि तीन दुचाकी असा सुमारे ७५ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.   विशाल सुनील कदम (वय ३२, रा. भारत नगर, मिरज), विजय सुरेश भोसले (वय … Read more

भारतीय जनता पार्टी 150+ जागा लढवणार?

भाजपकडून या विधानसभा निवडणुकीत १५० पेक्षा अधिक जागा लढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील ११० जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आले असून, ही यादी शक्य तितक्या लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.   दिल्ली येथे कोअर कमिटीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, … Read more

इचलकरंजीमध्ये व्यावसायिकाला मागितली दहा लाखाची खंडणी

gang war pune

रुई (ता. हातकणंगले) येथील समीर शब्बीर मुजावर (वय ४१) या व्यावसायिकाला दहा लाख रुपये दे अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबीयांना ठार – मारीन अशी धमकी देणाऱ्या संशयित शुभम दशरथ बुनाद्रे (रा. सुतारमळा इचलकरंजी), केतन अनिल मोरे (रा.ठाकरे चौक इचलकरंजी), अवधूत श्रीकांत जोंधळे (रा. षटकोन चौक इचलकरंजी) यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली … Read more

शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार ठरले

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.   रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुषगाने तयारी सुरू केली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदारांना मार्गदर्शन केले.   ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यमान आमदारांमधील … Read more

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सलमान खानला माफी मागावीच लागेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नाईचे नाव आले. त्यानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि काळवीट शिकार प्रकरण पुन्हा चर्चेत आले. सलमान खान आणि बिश्नोई समाजातील वाद मिटण्याची चिन्ह निर्माण झाला आहे.   काळवीट शिकर प्रकरणात सलमान खानवर बिश्नोई समाज नाराज आहे. 1998 पासून सुरु असलेला हा जुना वाद मिटण्याची चिन्ह निर्माण झाली … Read more

राहुल आवाडे भाजपाचे उमेदवार, तर मा. आमदार हाळवणकर यांना विधान परिषदेवर मिळणार संधी

बहुचर्चित इचलकरंजी विधानसभेचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जवळपास फिक्स झाला आहे . आणि ही उमेदवारी राहुल आवाडे यांनाच मिळण्याची शक्यता आहे तसे संकेतही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले आहे. माजी आमदार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्याशी असलेल्या मतभेदाला पूर्णविराम मिळाला असून, कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाने येणाऱ्या निवडणुकीला भाजप म्हणून एकसंधपणे सामोरे जाऊ. सुरेश हाळवणकर व … Read more

छत्रपती संभाजी महाराज चौकातच महाराजांचा पुतळा बसवणार

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा छत्रपती संभाजी महाराज चौकातच बसवला गेला पाहिजे, अन्यथा परिणाम वेगळे होतील, असा गंभीर इशारा -देत शिवशंभु भक्तांनी चौंडेश्वरी मंदिर, दातार मळा येथे बैठकीत शपथ घेतली. राजकीय इर्षेपोटी कॉ. के. एल. मलाबादे चौकात – छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा अट्टाहास केला जात आहे, तो तात्काळ सोडून देण्यात यावा. आमचा तुम्हाला … Read more

जेव्हा दाऊदने बाळासाहेब ठाकरे यांना संपवण्याचा कट रचला, तेव्हा…

तारीख होती 7 नोव्हेंबर 1995 मुंबई पोलिसांना सकाळीच आपल्या खबरी लोकांतर्फे माहिती मिळाली होती की आज एक व्यक्ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्यासाठी येणार आहे इतकंच नव्हे तर या व्यक्तीने रितसर बाळासाहेबांची अपॉइंटमेंट घेऊन तो त्यांना भेटीवेळी मारणार आहे असंही पोलिसांना कळालं होतं. मित्रांनो जी व्यक्ती मारेकरी म्हणून येणार होती ती कोणी साधी सुधी … Read more

धक्कादायक…कुत्रा चावल्याने दरवर्षी 60 हजार लोकांचा होतो मृत्यू

भटके कुत्रे, त्यांची संख्या, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना हा मागील काही दशकांमध्ये जगभरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात कोणत्या योग्य उपाययोजना आहेत, कोणत्या देशांना त्यात यश आलं आहे आणि सध्या जगभरात नेमका काय ट्रेंड सुरू आहे याबद्दल माहिती देणारा हा लेख… रेबीज या आजाराचा धोका जगभरात आहे. या आजारामुळे दरवर्षी जवळपास … Read more

संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस, शहाजीबापूंचा जोरदार हल्लाबोल

संजय राऊत हा रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस आहे. त्याला कपटनीती ही चांगल्या पद्धतीने येते. त्यांनीच ही भाजप आणि शिवसेनेची युती तोडली असल्याचा आरोप आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला. पुढे त्यांनी असे म्हटले की, संजय राऊताचं स्वप्न भंग करून पुन्हा आम्ही एक झालेले आहोत आमचं आणि भाजपचे सरकार आता सुरळीत चालू असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, शिंदे … Read more

कासव दाखवतो म्हणून 3 बालकांना दिले विहिरीत ढकलून

नाशिकमधील सिन्नर तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांना विहिरीत कासव असल्याचं सांगत तीन लहान चिमुकल्यांना ढकलून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यात वडगाव पिंगळे येथे घटना घडली आहे. पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस अधिकचा तपास सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. अथर्व घुगे, वरद घुगे आणि आदित्य सानप … Read more

लवकरच ठरणार महाविकास आघाडीच जागावाटपाचं सूत्र, काँग्रेस प्रदेशाध्यांकडून महत्त्वाची माहिती

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये जागावाटापाचं सूत्र ठरत आहे. या बैठकांमध्ये कोणता पक्ष किती जागा लढेल? याबाबत चर्चा सुरु आहे. विधानसभेची निवडणूक आता जवळ आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं फायनल जागावाटप कधीपर्यंत निश्चित होईल? याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार … Read more

प्रेयसीला भेटायला गेला, अन् कुटुंबाने केलेल्या मारहाणीत प्रियकर जीव गमावून बसला

gang war pune

प्रेयसीच्या घरी भेटायला गेलेल्या एका प्रियकराला प्रेयसीच्या कुटुंबियांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  धुळ्यातील साक्री तालुक्यात ही घटना घडली. या घटनेनंतर मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. मारहाण करणाऱ्या तरुणीच्या कुटुंबाला तात्काळ अटक करत त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नेमकं … Read more

😢मराठा-ओबीसी आमनेसामने; मनोज जरांगेनी दिला मंत्र्यांना इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागच्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणस्थळाकडे जाण्यासाठी काही मराठा आंदोलक निघाले. पण वडीगोद्री या गावात त्यांना अडवण्यात आलं. अंतरवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं.   यावेळी मराठा समन्वयक आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आले. तेव्हा दोन्ही बाजूच्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही बाब मनोज … Read more

ठाकरेंच्या शिवसेनेन काँग्रेसला ठणकावल, महाविकास आघाडीत होणार बिघाडी?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी बैठका, सभा यावर आता भर दिला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा टक्कर देण्यासाठी बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीबाबत चर्चेला सुरूवात केली आहे. जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीतील घटक … Read more

भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला.. कोण होणार भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष, 17 तारखेला फैसला

भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? यावर सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. तर पक्षातंर्गत मोठा खल सुरू आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेत यातील काही राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संघटनात्मक बदलावर भर देण्यात येणार आहे. तळागाळातील नेत्याला वरिष्ठ पदावर बसवण्याची खेळी खेळली जाऊ शकते. ओबीसी अथवा महिलेच्या हाती पक्षाची कमान … Read more

महाविकास आघाडी कडून हा नेता होणार मुख्यमंत्री

राज्यात ऑक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नुकताच नवी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्या भेटीत मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या. काँग्रेस निवडणुकीपूर्वी … Read more

पाकिस्तान इतिहासातून नष्ट होईल – योगी आदित्यनाथ

दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फाळणी विरोधी स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे. पाकिस्तानचे एकतर भारतात विलगीकरण होईल किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे मुख्यमंत्री योगी यांनी … Read more