भीषण अपघातात गाडीचा झाला स्फोट, बसही जळून खाक.

WhatsApp Group Join Now

सातारा (भुईज) : पुणे-बंगळूरु महामार्गावर सायंकाळी ६ वाजण्याच्या विचित्र अपघात झाला. दुचाकी व एस.टी. बस अपघातात दुचाकी पेटल्याने एस.टी. बसही पेटली. या एकाचा मृत्यू झाला. मदतकार्य वेळेत पोहचल्याने व प्रसंगावधान राखल्याने ३५ प्रवाशी बचावले आहेत.

साताऱ्यातल्या भुईंज-पाचवडदरम्यान महामार्गावर हॉटेल विरंगुळासमोर एस. टी. बस आणि दुचाकी अपघातात एक ठार तर एस.टी बससह दुचाकी जळून खाक झाली आहे. सुदैवाने ३५ प्रवाशी वाचले आहेत.

पुणेहून सातारा बाजूकडे जाणाऱ्या कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी चालकाला एस. टी. बस त्र्यंबकेश्वर ते पलूस जाणारे बसने MH 40 AQ 6303 ने पाठीमागून जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.

घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्ने फौजफाटा घेवून पोहचले. किसनवीर कारखाना आणि वाई नगरपालिकेच्या आग्नीशामक यंत्रणांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. यादरम्यान सातारा बाजूकडे जाणारी वहातूक ठप्प झाली होती.

WhatsApp Group Join Now

कारखान्याचे आणि वाई नगरपालिकेचे आग्नीशामक यंत्रणेने मदतकार्य करून आग आटोक्यात आणली होती या अपघातातील पेटलेली दुचाकी व दुचाकी चालकाची ओळख पटवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत चालू होते.

दरम्यान पोलीसांनी जळून खाक झालेल्या मोटार सायकलच्या चेसी नंबरवरून माहिती घेतली असता ती गाडी यामाहा कंपनीची असून ती स्वप्नील शरद डुबल रा. वडवली ता. कराड जि. सातारा यांचे नावावर असल्याचे आर टी ओ ॲपवरून समजत असल्याची माहिती मिळाली.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment