भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? यावर सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. तर पक्षातंर्गत मोठा खल सुरू आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.
लोकसभेत यातील काही राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संघटनात्मक बदलावर भर देण्यात येणार आहे. तळागाळातील नेत्याला वरिष्ठ पदावर बसवण्याची खेळी खेळली जाऊ शकते.
ओबीसी अथवा महिलेच्या हाती पक्षाची कमान देण्यावर पण भर देण्यात येत आहे.
भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक होत आहे. त्यात विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा होईल. संघटनात्मक निवडणुकांना या बैठकीत अंतिम रुप देण्यात येईल.
या बैठकीत आगामी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येणार आहे. या बैठकीत अध्यक्ष पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता नाही, पण बैठकीच्या अखेरीस केंद्रीय नेतृत्व नवीन अध्यक्ष पदाविषयी मोठी घोषणा करू शकते.