तारीख होती 7 नोव्हेंबर 1995 मुंबई पोलिसांना सकाळीच आपल्या खबरी लोकांतर्फे माहिती मिळाली होती की आज एक व्यक्ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्यासाठी येणार आहे इतकंच नव्हे तर या व्यक्तीने रितसर बाळासाहेबांची अपॉइंटमेंट घेऊन तो त्यांना भेटीवेळी मारणार आहे असंही पोलिसांना कळालं होतं.
मित्रांनो जी व्यक्ती मारेकरी म्हणून येणार होती ती कोणी साधी सुधी व्यक्ती नव्हती तर ज्यानं मुंबई मधल्या कित्येक मोठ्या लोकांना उघडपणे यमसदनी धाडलं होतं आणि त्याचा पोलिसांवर सुद्धा चांगला वचक होता. अशी ती व्यक्ती होती.
शिवाय त्या व्यक्तीला बाळासाहेबांना मारण्यासाठी दस्तरखुद्द कुख्यात अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहीमन पाठवलं होतं.
6 डिसेंबर 1992 या दिवशी बाबरी मस्जिद पाडली गेली जगभरात हा प्रसंग लाईव्ह प्रसारित झाला. त्यातल्या दृश्यात मशिदीचे घुमट खाली कोसळताना दाखवलं गेलं तसेच कार सेवक घुमटावर चढलेले दिसले. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर देशभर धार्मिक दंगल उसळली.
यात दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला खोलवर रुजलेल्या धार्मिक द्वेषामुळे या दिवसाची काळा दिवस म्हणून नोंद झाली. उत्तर हिंदुस्तान हादरल्यानं त्याची कंप मुंबई पर्यंत जाणवली.
दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशिदीच्या विध्वंसाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईत भयंकर दंगली उसळल्या त्यात जीवित हानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली. यातून मुंबई सावरते न सावरते तोच 1993 च्या साखळी बॉम्ब स्पोटानी ती पुन्हा हादरली. या साखळी बॉम्ब स्पोटामुळे मुंबई आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश दहशतीच्या छायेखाली होता.
अवघ्या मुंबईवर राजकीय वर्चस्व गाजवणाऱ्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला या दहशतवादी हल्ल्यामुळे तडे गेले. ठाकरेंनी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर 1994 च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी दाऊदला देश देशद्रोही म्हटलं त्याच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आणि नाईक हे हिंदू डॉन आहेत ही आमची मुलं आहेत या त्यांच्या वक्तव्याने मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाला आणखीनच हादरे बसले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या या भाषणामुळे गुंडांच्या टोळ्यांमध्ये धर्माच्या आधारावर फूट पडली दरम्यान बाळासाहेब दाऊदच्या निशाणावर आले. काही केलं तरी ठाकरे यांना संपवायचं हेच दाऊदने आपल्या मनाशी पक्क केलं आणि मुंबईमध्ये दाऊदच साम्राज्य सांभाळणाऱ्या अबू सालेम वर ही जबाबदारी देण्यात आली.
अबू सालेमन 7 नोव्हेंबर 1995 च्या दिवशी हा सगळा कट रचला. मित्रांनो जी व्यक्ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्यासाठी येणार आहे असं पोलिसांना कळालं होतं. ते दुसरं तिसरं कोणी नसून कुख्यात शूटर राजेश इग्वे ही होती. राजेश इग्वे हा पोलीस दलातच काम करायचा. पण अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला पोलीस दलातून निलंबित केलं गेलं होतं पूर्वाश्रमीचा पोलीस असल्यानं त्याचे पोलीस दलात सुद्धा काही कनेक्ट होते आणि त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातूनच त्याने शिवसेना प्रमुखांची अपॉइंटमेंट मिळवली होती.
शिवाय इग्वे हा हिंदू असल्या कारणानं त्याला बाळासाहेब यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं होईल या आशेने सुद्धा त्याच्यावर ही जबाबदारी दाऊदने दिली होती. इग्वेने पोलीस दलात असताना कमांडो ट्रेनिंग सुद्धा घेतली होती.
7 नोव्हेंबर 1995 ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर हल्ला होणार आहे ही माहिती मिळाली त्यावेळी पोलीस एकदम अलर्ट झाले. बाळासाहेब काय साधे सुधे व्यक्ती नव्हते देशभरातल्या सर्वात बलाढ्य नेत्यांच्या यादीत अग्रस्थानी असणार मोठं नाव.
त्यामुळे टीप मिळाल्यापासून सगळ्या मुंबईला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. सर्व पोलीस दल फक्त एकाच व्यक्तीच्या मागावर होतं ते म्हणजे राजेश इग्वेच्य.
पोलिसांनी जंगजंग पछाडलं अख्ख्या मुंबईमध्ये शोध सुरूच होता सगळी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट मोडवर होती बऱ्याच वेळानंतर एके ठिकाणी पोलीस अधिकारी कादर खान यांना राजेश इग्वेद दिसला.
खान यांनी त्याला सरेंडर करायला सांगितलं तोही निडर आणि बेधडक वृत्तीचा असल्यामुळे त्यांनी ही गोष्ट न जुमानता पोलिसांबरोबरच बेचूप गोळीबार करण्यास सुरुवात केली प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यामध्ये राजेश याचा मृत्यू झाला आणि सुदैवानं बाळासाहेब ठाकरे यांना संपवण्याचा दाऊदचा प्रयत्न असफल ठरला.