अश्विन, जो अनेकदा क्रिकेटच्या मैदानात आक्रमक असतो. टीएनपीएलच्या एका मॅचमध्ये रविचंद्रन अश्विनच्या भावनांना उद्रेक झाला आणि त्याचा आक्रमकपणाचं सर्वांनी लक्ष वेधून घेतलं. यावेळी त्याच्या सहकाऱ्याच्या एका चुकीमुळे अश्विन संतापला. अश्विनने थेट आपल्या जागेवरून उठून हात उचलण्याचा इशारा दिला, याचा विडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या कारणांमुळे अश्विन चिडला
अश्विनच्या टीम डिंडिगुल ड्रॅगन्सने 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, अश्विन तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला आला आणि त्याने चांगली खेळी केली. 14 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर त्याला आऊट झाल्यानंतर, टीमला विजयासाठी 30 चेंडूत 44 धावा आवश्यक होत्या.
परंतु, शिवम सिंह आणि बाबा अपराजितमध्ये गोंधळ झाल्यामुळे दोन्ही विकेट्स गमावल्या. अश्विन या घटनेमुळे अत्यंत संतापला आणि त्याने आक्रमक हातवारे करून त्याचा संताप व्यक्त केला.
सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया
अश्विनचा हा आक्रमक पवित्रा सोशल मीडियावर जोरदार चर्चा निर्माण करत आहे. त्याच्या हातवाऱ्यांचा आणि शब्दांचा इशारा कॅमेऱ्यात कैद झाला असून, यामुळे टीएनपीएलमधील या घटनेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. अश्विनच्या या घटनेने त्याच्या आक्रमक वागणुकीची एक वेगळीच बाजू उघडली आहे.
हेही वाचा :
धारदार शस्त्राने केला वार, दहशत माजवण्यासाठी रील केली व्हायरल
राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल, मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू