भीषण अपघात.. ट्रक-मोटरसायकल अपघातात युवक ठार

WhatsApp Group Join Now

आष्टा-तासगाव रोडवर आष्टा येथील विटभट्टी जवळ मोटरसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कृष्णा रमेश लोहार (वय २५, रा. आष्टा) हा युवक ठार झाला. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

याप्रकरणी राजाराम शंकर माने आष्टा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार आष्टा पोलिसात ट्रक चालक अनिकेत लक्ष्मण माने (वय २३,रा खंडोबाचीवाडी ता. पलूस) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत कृष्णा हा पल्सर मोटरसायकल (क्र. एम एच सीएल ३१५९) वरून आष्टा तासगाव रस्त्यावरून येत होता.

यादरम्यान अनिकेत माने हा भारत बेन्झ कपंनीचा दूध वाहतूक करणारा पांढऱ्या रंगाचा सहा चाकी ट्रक क्र १२- ६२८२ घेऊन भरधाव वेगात होता.

WhatsApp Group Join Now

लगतच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने समोरून येणाऱ्या पल्सर मोटरसायकलला जोराची धडक दिली.

धडक इतक्या जोराची होती की धडकेत कृष्णा हा मोटरसायकलसह फरफाटत गेला. त्याचा एक पाय कंबरेपासून तुटला. तो गंभीर जखमी झाला. जखमी स्थितीत त्याला उपचारासाठी सांगलीला हालवले मात्र रक्तस्त्राव होऊन तो मयत झाला. अपघाताची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराने गर्दी केली होती.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment