धक्कादायक…पोलिसांनी भारतीय लष्कराच्या जवानाला निर्वस्त्र करुन केली मारहाण

WhatsApp Group Join Now

भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शत्रूंना रोखून धरत सडेतोड प्रत्युत्तर देत असतात. मात्र घरी आल्यानंतर त्यांना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळते. असाच एक प्रकार राजस्थानच्या जयपूरमधून समोर आला आहे. जयपूरमधील शिप्रापथ पोलीस ठाण्यात पोलिसांनी लष्कराच्या कमांडोला विवस्त्र करून काठीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी शिप्रा पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. जेव्हा पोलिस लष्कराच्या जवानांशी असे वागतात, तेव्हा सर्वसामान्यांना कसं वागवेल जात असेल असा सवाल आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केला.

जयपूरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानावर हल्ला केल्याचा आरोप जयपूर पोलिसांवर आहे. शिप्रापथ पोलीस ठाण्यात लष्कराच्या जवानाला विवस्त्र करून मारहाण करून आरोपींमध्ये बसवल्याचा आरोप आहे. एवढ्यावच न थांबता त्यांनी पोलीस हा लष्कराचा बाप आहे, असे देखील म्हटलं.

आदल्या दिवशी खरं पोलिसांनी हुक्का बारवर छापा टाकून लष्कराच्या एका जवानाला ताब्यात घेतले होते. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले लष्कराचे शिपाई अरविंद सिंग हे ताब्यात घेतलेल्या सैनिकाची माहिती घेण्यासाठी शिप्रापथ पोलीस ठाण्यात पोहोचले असता त्यांना मारहाण करण्यात आली.

WhatsApp Group Join Now

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये पीडित सैनिक अरविंद सिंग यांनी सांगितले की, “माझा मित्र राजवीर शेखावत ११ ऑगस्टला रात्री त्याच्या मित्रांसोबत पार्टीला गेला होता. पोलिसांनी वाईन क्लबवर छापा टाकल्यानंतर त्याला शिप्रपथ पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

मला माहिती मिळताच मी पोलीस ठाण्यात गेलो. मी अटकेचे कारण विचारले असता माझ्याशी असभ्य वर्तन करण्यात आले. मला विवस्त्र करण्यात आले, रिमांड रूममध्ये नेऊन मारहाण करण्यात आली.” याशिवाय राजस्थान पोलीस हे लष्कराचे बाप असल्याचेही पोलिसांनी म्हटलं.

लष्कराच्या जवानासोबत झालेल्या मारहाणीचे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड जयपूरमधील शिप्रापथ पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी सहायक पोलिस आयुक्त मानसरोवर संजय सिंह यांना धारेवर धरलं. “काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाला जयपूरमध्ये काही पोलिसांनी विवस्त्र करून मारहाण केली. यानंतर, त्याला विवस्त्र करून लोकांमध्ये बसवल्यानंतर, काही पोलिसांनी त्याला पुन्हा सांगितले की पोलिस हे भारतीय सैन्याचे बाप आहेत.

हे अत्यंत खेदजनक आहे, यावरून त्या २-३ पोलिसांची घृणास्पद मानसिकता दिसून येते. मी राजस्थान पोलिसांचा आदर करतो आणि मला त्यांच्यावर विश्वास आहे की ते अशा घृणास्पद मानसिकतेच्या पोलिसांवर कारवाई करतील,” असे राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment