Amol Mitakari on Raj Thakare
कालच राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यात अजित पवारांवर टीका केली होती. त्यामुळे आता दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आणि आज अजित पवारांचे विश्वासू अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला झाला. यामुळे राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अमोल मिटकरींची पोलिसात फिर्याद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर हल्ला झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. Amol Mitakari on Raj Thakare
राज ठाकरेंच्या आदेशावर हल्ला
अमोल मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गाडीवर हल्ला आणि तोडफोड मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आदेशावरून झालं आहे. फिर्यादीत राज ठाकरेंच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. Manase attack on Amol Mitakari
मनसे विरुद्ध राष्ट्रवादी वाद
मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली आणि त्यांच्या वर हल्ला केला. यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद चांगलाच चिघळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मनसेतील 13 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
परिवाराला धमकी आणि गुंडांची टोळी
अमोल मिटकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितलं आहे की, हल्ला झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला जिवंत मारण्याची धमकी देण्यात आली होती. गुंडांची एक मोठी टोळी शासकीय इमारतीत घुसून एक तास धुडगूस घालून बाहेरून परिवाराला हल्ला करण्याची धमकी देत होती, असं त्यांनी म्हटलं आहे.
मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू
आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार सहभागी होते.
राज ठाकरेंवर आरोप केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन अमोल मिटकरी यांची गाडी फोडली, ज्यात जय मालोकार यांचा सहभाग होता. राड्यानंतर अस्वस्थ झालेल्या जय मालोकार यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना छातीत दुखण्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : अजित पवार पुण्यात नाहीत तरीही धरण भरलंय, राज ठाकरेंचा पवारांना खोचक टोला