श्रीनगर : भारत आणि पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. राजौरी, उरी, जम्मूमध्ये पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबार केला आहे. तर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहे. भारतीय सैन्यानेही जशास तसे उत्तर देत जोरदार पलटवार करत हल्ले परतावून लावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानी सैन्याचे नापाक हल्ले सुरूच आहे. सीमेवर तणाव वाढत चाललेला असताना पाकिस्तान लष्कराने राजौरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आहे.
भारतीय लष्करानेही तात्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या भागात तोफगोळ्यांचा आवाज आणि गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षा दल सतर्क आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. खुद्द जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनीही स्फोटाचा आवाज ऐकू येत आहे, असं ट्वीट करून सांगितलं आहे.

तर, उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गेल्या एक तासापासून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोळीबार आणि तोफगोळ्यांचा आवाज सातत्याने ऐकू येत असून भारतीय लष्कर सज्ज असून जोरदार प्रत्युत्तर देत आहे. सीमा भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ही कारवाई सीमावर्ती तणाव अधिक गडद करत असल्याची चिन्हं दिसत आहेत.
हेही वाचा –
पाकिस्तान आणि चीनची मस्ती जिरवणाऱ्या S-400 ची किंमत किती?
मोदी साहेबांनी ठरवलं तर अर्धा तासात पाकिस्तान संपेल
IPL स्थगितीनंतर हार्दिक पंड्या आणि जास्मिन एकत्र परतले ; अफेअरच्या चर्चांना हवा