हिऱ्यासारखी लोक उद्धव ठाकरेंना सांभाळता आली नाही…आमदार अर्जुन खोतकर यांचे मोठे विधान

WhatsApp Group Join Now

शिवसेना उबाठाला गळती लागली आहे. अनेक जण शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यावर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव साहेबांना हे जे हिऱ्यासारखे आपले लोक होते ते सांभाळता आले नाही, हे दुर्दैव आहे, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले.

राजन साळवी यांचा पक्षप्रवेशावर अर्जुन खोतकर म्हणाले, उद्धव साहेबांना सोडून जाण्याचा प्रश्न नाही. त्यांनी विचारधारा बदलली आहे. शिवसेनाप्रमुखांचे आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर हीच कमान उद्धव ठाकरे यांच्या हातात आली होती. परंतु उद्धव साहेबांना हे जे हिऱ्यासारखे आपले लोक होते ते सांभाळता आले नाही, हे दुर्दैव आहे, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सोडून जाताना एकनाथ शिंदे असतील किंवा मी असेल आम्हाला दुःख झालेलच आहे. आम्ही काय आनंदाने थोडी गेलो होतो किंवा शिंदे साहेब थोडी आनंदाने गेले? असा प्रश्न अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – कोणी काम देत का काम! इंडस्ट्री गाजवणाऱ्या सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली खंत

खरी शिवसेना पुढे नेतोय…

WhatsApp Group Join Now

शिवसेनेत एक चांगली गोष्ट घडली आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेत आहोत. त्यामुळे साहजिकच अशा सर्व लोकांना शिवसेना सोडताना त्रासच होणार आहे. आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला आणि खासदारांना सूचना दिल्या त्यावर बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, आता सूचना देऊन काय फायदा आहे. आता पाणी वाहून गेलेला आहे. आता काही होणार नाही. डॅमेज कंट्रोलच्या बाहेर या सर्व गोष्टी गेलेल्या आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच आता ज्याला जायचे त्यांनी जा, असे म्हटले आहे. म्हणजे त्यांच्या हातातले सगळे संपलेले आहे. कोणीही हातामध्ये आता राहिलेले नाही. तशीच अवस्था आता आदित्य ठाकरे यांची झालेली आहे, असे म्हणत खोतकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल गेला.

हेही वाचा – General Knowledge : फाशी देण्याआधी कैद्याच्या कानात काय सांगतो जल्लाद? तुम्हाला माहितीय का उत्तर?

WhatsApp Group Join Now

Leave a Comment