इचलकरंजीमध्ये व्यावसायिकाला मागितली दहा लाखाची खंडणी

WhatsApp Group Join Now

रुई (ता. हातकणंगले) येथील समीर शब्बीर मुजावर (वय ४१) या व्यावसायिकाला दहा लाख रुपये दे अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबीयांना ठार – मारीन अशी धमकी देणाऱ्या संशयित शुभम दशरथ बुनाद्रे (रा. सुतारमळा इचलकरंजी), केतन अनिल मोरे (रा.ठाकरे चौक इचलकरंजी), अवधूत श्रीकांत जोंधळे (रा. षटकोन चौक इचलकरंजी) यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, समीर शब्बीर मुजावर यांचा २०१३ ते २०२४ पर्यंत एअरटेल कंपनीचे वितरक म्हणून इचलकरंजीमध्ये व्यवसाय होता. शुभम बुनाद्रे व केतन मोरे हे या दुकानात काम करत होते. सन २०२३ मध्ये शुभम व केतन यांच्यामध्ये आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद झाला व त्यांनी या दोघांना कामावरून काढून टाकले. यावेळी त्यांनी आमच्यामुळे तुमचा भरपूर फायदा झाला आहे. आम्हाला त्यातले दहा लाख रुपये दे अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली.

 

WhatsApp Group Join Now

त्यानंतर समीर मुजावर यांनी याची तक्रार इचलकरंजी पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर हा प्रकार थांबला होता. परत दि.२८ मे २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी समीर मुजावर व त्यांची पत्नी कोल्हापूरवरून काम आटोपून घरी सांगली फाटा हेरलेमार्गे रुई येथील आपल्या घरी चार चाकी वाहनातून जात होते. तेव्हा अतिग्रे गावच्या हद्दीतून संशयित आरोपी शुभम, केतन व अवधूत यांनी गाडीचा पाठलाग करत गाडी समोर मोटरसायकल आडवी लावली आणि फिर्यादी समीर मुजावर यांना थांबवले आणि गाडीतून जबरदस्तीने बाहेर काढले.

 

शुभम केतन व अवधूत यांनी मुजावर यांना धक्काबुक्की करत त्यांच्या हातात असलेले चाकूचा धाक दाखवत दहा लाख रुपयांची मागणी केली व दहा लाख रुपये न दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन तेथून ते मोटरसायकलीवरून निघून गेले. या प्रकरणानंतर भिऊन मुजावर काही दिवस गप्प राहीले, त्यानंतर घरच्यांशी चर्चा करून आज त्यांनी हातकणंगले पोलिसात तक्रार दाखल केली. याचा अधिक हातकणंगले पोलिस करत आहेत.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment