भारताचा स्टार बॉलर युगवेंद्र चहलचा करिष्मा- 10 ओव्हर मध्ये दिल्या फक्त 14 रन्स आणि घेतल्या 5 विकेट

WhatsApp Group Join Now

इंग्लंडमध्ये सध्या वनडे कप ही देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने पदार्पण केले आहे. महत्त्वाचं म्हणजे पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शानदार कामगिरी केली आहे.

तो नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळत असून बुधवारी (१४ ऑगस्ट) केंट विरुद्ध या स्पर्धेतील पहिला सामना खेळला. त्याने या सामन्यात नॉर्थहॅम्प्टनशायरसाठी पाच विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.

नॉर्थहॅम्प्टनशायरने हा सामना ९ विकेट्सने जिंकला. या सामन्यात केंटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सुरुवातीला नॉर्थहॅम्प्टनशायरच्या जस्टीन ब्रॉड आणि ल्युक प्रोक्टर यांनी केंटला धक्के दिल्यानंतर मधल्या षटकांमध्ये युजवेंद्र चहलने कमाल केली. आणि 10 ओवर्स मध्ये पाच विकेट घेतल्या.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment