आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ९८.९७ टक्के नोंदणी झाली असून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी तात्काळ बँक खाते आधार लिंक करुन घ्यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी महिलांना सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यात ६ लाख ९६ हजार १०० अर्ज प्राप्त झाले होते. तथापि २६ हजार ७०८ लाभार्थ्यांचे आधार नंबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दिलेल्या बँक खात्याशी लिंक झालेले नाहीत.
आधार लिंक नसलेल्या बँक खात्यांची माहिती संबंधित गावात, प्रभागात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र सर्व महिलांचा आधार क्रमांक बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आधार लिंक न के ले ल्या बँक खात्यांची तालुकानिहाय संख्या यामध्ये करवीर-८ हजार ४३, हातकणंगले-४ हजार ९४१, शिरोळ – २ हजार ९२९, कागल- २ हजार ४१२, पन्हाळा – १ हजार २१२, गडहिंग्लज-१ हजार४८३, राधानगरी १ हजार ७०७, चंदगड ८६१, शाहूवाडी – १ हजार २०७, भुदरगड- ९९४, आजरा- ६७३ व गगनबावडा- २४६ असे एकूण २६ हजार ७०८ बँक खाती आधारला लिंक केलेली नाहीत.