उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर चप्पल फेकून मारायची होती इच्छा, मनसे नेत्याचं वादग्रस्त विधान

WhatsApp Group Join Now

ठाण्यात शनिवारी मोठा राडा पाहायला मिळाला. मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ, शेण आणि टोमॅटो फेकून मारले. त्यानंतरल ठाण्यातील गडकरी रंगायतन सभेच्या ठिकाणीही दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. या राड्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माझी इच्छा होती चप्पल फेकून मारायची, मनसे नेत्याचं मोठं विधान; त्या राड्यानंतर मनसे आक्रमक?

ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी नारळ, शेण आणि टोमॅटो फेकून मारले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकून मारल्या होत्या. त्यानंत मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठरवून उद्धव ठाकरे ठाण्याकडे जात असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. ठाण्यातील या राड्यानंतर ठाणे मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोठं विधान केलं आहे.

राज ठाकरे यांच्या नादाला लागाल तर जशास तसे उत्तर देणार

जिथे जाल तिथे उत्तर देणार. केसेस घ्यायला आम्ही घाबरत नाही. माझी इच्छा होती चप्पल फेकून मारायची. आम्ही सकाळ पासून तयारीत होतो ते रात्री आले. उद्धव ठाकरे कधीही विसरणार नाही, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना अविनाश जाधव यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

संजय राऊत हे सकाळी उठून सुपाऱ्या वाजवत असतो.

संध्याकाळी सेटल मेन्ट करणारा संजय राऊत हा माणूस, उद्धव ठाकरे जिथे गेले असते तिथे आम्ही गेलो असतो. हा मर्द गडकरी रंगायतन येथे वर बसला होता. तुमचा मर्द शेपूट लपून बसला होता. तुम्ही 5 उतरवले तर आम्ही 500 रस्त्यावर उतरू, तुमच्या घरात देखील मूल बाळा आहेत. आमच्यात कुटुंबियापर्यंत जाण्याची संस्कृती नाही, असं म्हणत अविनाश जाधव यांनी राऊतांवर टीका केली.

WhatsApp Group Join Now

आम्ही मुंबई पण येऊ, आज च्या आंदोलनात आमचे हात पाय सर्व होते. तुम्ही माझं एक ऑफिस पाडाल तर मी तुमचे चार ऑफिस फोडणार. माझ्या एका कार्यकर्त्याला मारले तर तुमच्या चार कार्यकर्त्याला मारणार, यांचे बॅनर आम्ही रात्रीच फाडले असते. मर्द असाल तर या समोर, मी उत्तर दिले आहे. राजन विचारे यांनी मला उत्तर दिले तर तशाच तसे उत्तर दिले जाईल विचारे साहेबांनी माझ्या नादी लागू नये. जितेंद्र आव्हाड यांना मस्करीत घ्यायचे असते. मी घरा घरा मध्ये जाऊन काम केले आहे आम्ही उत्तम काम केले आहे. या निवडणुकीत आम्ही गाडणार म्हणजे गाडणार, असंही अविनाश जाधव म्हणाले.

हेही वाचा:

महायूतीला धक्का…मनोज जरांगे निवडणुकीला उभे राहणार, सोबतच 150 मराठा उमेदवार उभे करणार

WhatsApp Group Join Now

Leave a Comment