इराणच्या तेहरानमध्ये हमासचे सर्वोच्च नेते इस्माईल हानिया यांच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये ते ठार झाले. हा हल्ला कसा आणि कोणत्या पद्धतीने पार पडला यावर सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. व्हॉट्सॲपच्या कनेक्शनमुळे हानिया यांचा खात्मा करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. त्यांच्या ठिकाणाच्या माहितीमुळे हल्ला करणे सोपे झाले, असा आरोप आहे.
व्हॉट्सॲपचे कनेक्शन
हानिया यांचे स्थान व्हॉट्सॲपच्या माध्यमातून समजले असल्याचा दावा केला जात आहे. व्हॉट्सॲपचे सहसंस्थापक बोरिसोविच याच्यावर या घटनेशी संबंध जोडला जात आहे. बोरिसोविच, जो यहुदी धर्माला मानतो, त्याने हानिया यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲपमधून हेरगिरी केली आणि त्याच्या ठिकाणाची माहिती इस्त्राईलच्या गुप्तहेर संघटनेला दिली. हानिया यांचे ठिकाण सापडल्यामुळे, मोसादने त्यावर थेट हल्ला केला.
खतरनाक प्लॅन आणि मोसादची भूमिका
हानिया तेहरानमध्ये एका सुरक्षित ठिकाणी होते आणि त्यांच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप सक्रिय होते. मोसादने हानिया यांच्या मोबाईलवर स्पाईवेअर मॅसेज पाठवला, ज्यामुळे हानिया यांची गुप्त माहिती मोसादने मिळवली. हानिया यांचे अचूक स्थान मिळाल्यावर, मोसादने क्षेपणास्त्र डागून हानिया यांचा खात्मा केला. यापूर्वीही मोसादने गाझा पट्टीत आणि लेबनानमध्ये अनेक विरोधकांना असेच ठार केले आहे. मोसादच्या या खतरनाक कारनाम्यांची एक लंबी यादीच आहे.
हेही वाचा :
धारदार शस्त्राने केला वार, दहशत माजवण्यासाठी रील केली व्हायरल
राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल, मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू