राजकीय वर्तुळात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची चर्चा जोर धरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फडणवीस यांनी सहकुटुंब भेट घेतल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाल आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांची जागा घेण्याच्या शर्यतीत फडणवीस अग्रस्थानी आहेत.
जेपी नड्डा यांची जागा घेणार फडणवीस
भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित झाला होता.
भाजपचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांची मोदी ३.० सरकारमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोण येणार, हे चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.
यामुळे होऊ शकतात फडणवीस अध्यक्ष
देवेंद्र फडणवीस यांची भाजप अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवारी मानली जात आहे. त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगल्या नात्यांसोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांच्या संबंधांमुळे देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रेसर आहे.
यामुळे भाजपा महाराष्ट्र मध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.