राज ठाकरेंचा पुणे दौरा आणि अजित पवारांना केल टार्गेट
मनसेचे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतरच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली. विशेषत: पुण्यातील धरणांबद्दल आणि त्यांच्या परिस्थितीवर त्यांनी असंतोष व्यक्त केला.
Raj Thackeray on Ajit Pawar
अजित पवार यांना लगावला टोला
राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरस्थितीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला. “राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, तरीही धरणातून पाणी वाहिलंय. पुण्यात अचानक पूर आला, तर अजित पवार यांनी याकडे लक्ष द्यायला हवं होतं,” असे त्यांनी यावेळी नमूद केले. यामुळे आता अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यात मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील नगरसेवकांची भूमिका आणि राजकीय एकजूट
पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पुण्यातील नगरसेवकांना आणि राज्याच्या प्रमुखांना खडेबोल सुनावले. “जे लोक नगरसेवक आहेत, त्यांनी परिस्थितीकडे गंभीरपणे लक्ष द्यायला पाहिजे. एका प्रकल्पासाठी चर्चा होण्याची आवश्यकता आहे. राजकीय पक्षांनी एकत्र बसून काम केले पाहिजे, कारण एकटा पक्ष या समस्येचे समाधान करू शकणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक पुण्यातील आहे, तरीही त्यांनी यामध्ये लक्ष देणे आवश्यक आहे, असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.