अभिनय, निर्माते, दिग्दर्शक, गायक अशा चतुरस्त्र भूमिका गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर.
सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा 2′ हा सिनेमा काही महिन्यांआधी रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतले. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला.
नवरा माझा नवसाचा’ हा मराठीतील कल्ट सिनेमा ठरला. 20 वर्षांनी ‘नवरा माझा नवसाचा 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला.
सचिन पिळगावकर यांनी नुकतीच ‘देवाचे घर’ सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. तेव्हा एका मुलाखतीत बोलताना त्यांनी “इंडस्ट्रीत मला कोणी काम देत नाहीये” याचा खुलासा केला.
लोकमत फिल्मीशी बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले, “मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी माझ्याकडे सध्या कोणतेही काम नाही आणि मला कोणी कामही देत नाही
आमच्या सिनेमात काम करा असे म्हणायला माझ्याकडे कोणी येतही नाही. ते का येत नाहीत हे मला माहिती नाही. त्यांना कदाचित वाटत असेल की मी एक्टिंग सोडली आहे, तर ती चुकीची समजूत आहे.