General Knowledge : फाशी देण्याआधी कैद्याच्या कानात काय सांगतो जल्लाद? तुम्हाला माहितीय का उत्तर?

WhatsApp Group Join Now

देशात वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा सुनावली जाते. काही गुन्ह्यासाठी फाशी शिक्षा देखील दिली जाते.

सिनेमात तुम्ही याबद्दल नक्कीच पाहिलं असेल. आता फाशीच्या शिक्षेचं प्रमाण कमी झालं असलं तरी एक काळ असा होता, जेव्हा स्वातंत्र्य सैनिकांना फाशी दिली जायची.

त्यावेळी तुम्ही पाहिलं असेल की एक व्यक्ती ज्याला जल्लाद म्हटलं जातं, तो कैद्याला फाशी देतो. त्यापूर्वी हा जल्लाद कैद्याच्या कानात काहीतरी सांगतो किंवा कुजबुजतो. पण हा जल्लाद कैद्याच्या कानात नक्की काय सांगतो तुम्हाला माहितीय का?

खरंतर कैद्याला किंवा गुन्हेगाराला फाशी देताना ही काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. ज्यामध्ये फाशीची वेळ, फाशीची दोरी आणि त्याची प्रक्रिया अशा गोष्टींचा समावेश आहे.

WhatsApp Group Join Now

हेही वाचा- मुस्लीम धर्म सोडून सनातन धर्मात घरवापसी केल्यास ₹3000 महिना; स्वतः हिंदू झालेल्या माजी वक्फ बोर्ड अध्यक्ष वसीम रिझवी यांची घोषणा

गुन्हेगाराला फाशी देण्याच्या दिवशी आंघोळ घालून नवीन कपडे घालायला देतात. सकाळ सकाळ गार्ड सुप्रिटेंडेंच्या उपस्थीतीत गुन्हेगाराला फाशी देण्याच्या ठिकाणी घेऊन जातो.

फाशीच्या वेळी जल्लाद व्यतिरिक्त अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी उपस्थित असतात. यानंतर कैद्याकडून डेथ वॉरंटवर सही करुन घेतली जाते.

त्यानंतर कैद्याला जल्लाद कडून त्याची शेवटची इच्छा विचारली जाते आणि त्यानंतर हा जल्लाद कैद्याच्या कानात काहीतरी सांगतो आणि मग त्याला फाशी देतो.

फाशी देताना जल्लाद गुन्हेगाराच्या कानात बोलतो, ‘हिंदूंना राम राम आणि मुस्लिमांना सलाम. मी माझ्या कर्तव्याने बांधील आहे. तुम्ही सत्याच्या मार्गावर जावे अशी माझी इच्छा आहे.’

 

हेही वाचा- पठ्ठ्याने तब्बल 25 लाखांची नोकरी नाकारली; म्हणतोय 87 टक्के वाढ ही पुरेशी नाही

WhatsApp Group Join Now

Leave a Comment